Ambegaon Leopard Captured : भराडीत बिबट्याची दहशत संपली! दोन दिवसांपूर्वी शेळीला ठार करणाऱ्या मादी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश
Leopardess Trapped in Ambegaon's Bharadi Village : आंबेगाव तालुक्यातील भराडी येथील अरगडे मळ्यात बिबट मादीला जेरबंद करण्यात वनविभागाला गुरुवारी मध्यरात्री यश आले, ज्यामुळे परिसरात वाढलेली बिबट्याची दहशत कमी झाली आहे.
निरगुडसर : भराडी (ता.आंबेगाव) येथील अरगडे मळ्यात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवार (ता.३०) रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बिबट मादी अखेर जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले.