आंबेगावला दमदार पावसाची प्रतीक्षा

आंबेगावला दमदार पावसाची प्रतीक्षा
Published on

फुलवडे, ता. २३ : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. परंतु अपेक्षित पाऊस न पडल्याने येथील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत.
डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, अद्याप दमदार आणि सलग पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकरी व नागरिक दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
खरीप हंगामाची तयारी बहुतांश शेतकऱ्यांनी पूर्ण केली असून पेरणीसाठी आवश्यक असलेला समाधानकारक पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतीसाठी आवश्यक ओलावा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेला नाही.
हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

05254

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com