

12 year-old boy escapes leopard attack
Sakal
निरगुडसर : रात्रीची पावणेआठ वाजण्याची वेळ,कुटुंबातील सर्व जण जेवण करत होते यावेळी १२ वर्षीय राकेशने घराचा दरवाजा उघडून बाहेर प्रवेश करणार तोच समोर अवघ्या सहा ते सात फुटावर बिबट्या, हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेला बिबट्या आरडाओरड झाल्याने पसार झाल्याची घटना निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील नह्यार मळा येथे घडली.यावेळी काळ आला पण वेळ आली नसल्याची प्रचिती मिळाली.