
Tragic Accident: Child Crushed Under Uncle’s Pickup in Ambegaon
-डी. के. वळसे पाटील
मंचर : आदर्श गाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शेरेमळा येथे शेतातील रस्त्यावर खेळत असताना सख्ख्या काकाच्या पिकअपखाली आल्याने चार वर्षांच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने गावडेवाडी परिसर शोकाकुल झाला आहे.