Impact on Daily Life and Public Safety
sakal
मंचर : “ आंबेगाव तालुक्यात मंचर,निघोटवाडी ,लांडेवाडी,श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग,महाळुंगे पडवळ सह पूर्व भागातील ४५ गावे व तीस वाड्या वस्त्यांवर बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे व दहशतीमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम झाला आहे. किर्तन-प्रवचन, सत्यनारायण पूजा, स्वागत समारंभ, तसेच सकाळ-संध्याकाळ व्यायामासाठी रस्त्यावर ये-जा करणारे ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात घटत चालली असून, “हा बिबट्यांचा प्रश्न कधी संपुष्टात येणार?” असा सवाल सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.