esakal | आंबेगाव: वृक्षारोपण करून 'हरीत'श्रद्धांजली
sakal

बोलून बातमी शोधा

ambegaon

आंबेगाव: वृक्षारोपण करून 'हरीत'श्रद्धांजली

sakal_logo
By
सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव: मेंगडेवाडी ता. आंबेगाव येथील रणपिसे कुटुंबियांकडून निरगुडसर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष देवराम बाळाजी रणपिसे यांच्या निधनानंतर जलप्रदूषण टाळण्यासाठी रक्षा पाण्यामध्ये विसर्जित न करता खड्डय़ात विसर्जित करून, त्यामध्ये २५० रोपांचे वृक्षारोपण करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

हेही वाचा: Pune : राष्ट्रवादी कॉंग्रेसची जंबो शहर कार्यकारिणी जाहीर

वटवृक्ष मेंगडेवाडी-एक हरीत चळवळ या ग्रुप अंतर्गत मुक्तादेवी मंदिराजवळील गण्या डोंगरावर होणार्‍या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये देवराम बाळाजी रणपिसे यांच्या स्मरणार्थ २५० रोपांचे वृक्षारोपण करून हरीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, चिंच, आंबा व जांभूळ ही देशी रोपे लावण्यात आली.

त्यामध्ये स्मशानभुमी, मराठी शाळा, गावातील विविध चौकामध्ये व श्री गण्या डोंगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ही झाडे भविष्यात नेहमीच आमच्या वडीलांच्या स्मृतींना उजाळा देतील अशी भावना त्यांचा मुलगा व वटवृक्ष

मेंगडेवाडी ग्रुप चालविणारे सागर देवराम रणपिसे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी त्यांच्या मुली, जावई, सुन, पुतणे व नातवंडे उपस्थित होते. वृक्ष संवर्धनासाठी लागणाऱ्या ठिबक, संरक्षक जाळीचा खर्च त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला.

loading image
go to top