

Strong Response from SHG Women in Ambegaon
Sakal
घोडेगाव : घोडेगाव आंमोडी व डिंभा बुद्रुक येथे उपजिविका व उद्योजकता प्रशिक्षणात बचत गटांतील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आंबेगाव तालुक्यात यशवर्धिनीच्या मार्गदर्शनातील बचत गटांतील गरीब व गरजू महिलांना यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयं सिध्द संघ आंबेगाव यांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण भारतात २०१४ पासून कार्यरत असणाऱ्या एफ डब्लू डब्लू बी संस्थेच्या माध्यमातून महिला उपजीविका आणि उद्योजकता कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे.ह्या कार्यक्रमांतर्गत महिलांना उपजिविका व उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून यामध्ये आर्थिक शिक्षण, व्यवसाय व्यवस्थापन कौशल्ये, मार्केट लिंकेज, उत्पादन वैविध्य आणि इतर जोडण्यांवर क्षमता-निर्मिती इनपुट प्रदान केले जात आहे.