

Leopard Trapped Near Ambeshet Ghodegaon
sakal
घोडेगाव : मनोज गजानन काळे यांच्या डोंगराजवळील शेतात लावलेल्या पिंज-यात हा बिबटया सोमवारी रात्रीच्या दरम्यान अडकला. आंबेशेत येथे रविवारी दिवसा दुपारच्या वेळी एका बिबटयाने धनगाराच्या मेंढयांच्या कळपातील एका शेळीवर हल्ला करून शेळीचा फडशा पाडला. त्यावेळी वनविभागाला याची माहिती मिळताच त्यांनी त्वरीत संबंधित ठिकाणी पिंजरा लावला. सोमवारी रात्रीच्यावेळी बिबटया पिंज-यात जेरबंद झाला. मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पिंजरा वन विभागाच्या गाडीत चढविण्यात आला.