Sakal Impact : आंबेठाण ग्रामपंचायतीने वाहतूक कोंडीला पर्याय ठरत असलेल्या चेंबरचा खड्डा केला दुरुस्त

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या चाकण ते भांबोली या रस्त्याचे काही महिन्यांपूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले
Ambethan Gram Panchayat repaired pothole traffic jam sakal impact pune marathi news
Ambethan Gram Panchayat repaired pothole traffic jam sakal impact pune marathi newsSakal

आंबेठाण : चाकण-तळेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडीला पर्याय ठरत असलेल्या चाकण-आंबेठाण रस्त्यावरील आंबेठाण (ता.खेड) गावच्या हद्दीत असणारा चेंबरचा खड्डा वाहतूककोंडीला कारणीभूत ठरत होता. एक ते दोन तास ट्रॅफिक यामुळे होत होती. त्याबाबत दैनिक सकाळने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत आंबेठाण ग्रामपंचायतीने तात्काळ हा चेंबरचा खड्डा दुरुस्त केला आहे.

तात्काळ सकाळच्या या वृत्ताची दखल घेतल्याबद्दल आंबेठाण ग्रामपंचायतीचे आणि संभाव्य अपघाताची शक्यता लक्षात घेता ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल दैनिक सकाळचे आभार व्यक्त केले जात आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या चाकण ते भांबोली या रस्त्याचे काही महिन्यांपूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. परंतु त्यापैकी आंबेठाण गावठाणाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याचे काम काही वर्षांपूर्वी आंबेठाण ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संमतीने केले होते.

त्यामुळे आता जेव्हा या रस्त्याचे काम करण्यात आले तेव्हा हा भाग तसाच ठेवण्यात आला.परंतु पूर्वी काम केलेल्या या अंतरात गटारीचा चेंबर येतो.अवजड वाहतूक होत असल्याने दिवसेंदिवस हा चेंबर असलेला खड्डा खाली खचत आहे.जवळपास दीड ते दोन फुटांपर्यंत हा खड्डा पडला आहे.त्यामुळे अपघाताची शक्यता होती.

याबाबत दैनिक सकाळने वृत्त प्रसिद्ध केले होते आणि या मार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीला हा खड्डा कसा कारणीभूत आहे हे विशद केले होते.वाहनचालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नव्हता आणि मग त्यात वाहने अडकून वाहतूककोंडी होत होती.सकाळ,संध्याकाळ तर या भागात दोन-दोन तास ट्रॅफिक होत होती आणि त्याला केवळ एक खड्डा कारणीभूत ठरत होता.

Ambethan Gram Panchayat repaired pothole traffic jam sakal impact pune marathi news
Pune News : आंबेठाणचा 'तो' खड्डा ठरतोय ट्रॅफिकसाठी ब्लॅक स्पॉट,एका खड्ड्याने MIDC वेठीस, प्रशासनाकडून दुर्लक्ष

आंबेठाण ग्रामपंचायतीने तात्काळ या चेंबरच्या खड्ड्याची दुरुस्ती केली असून त्यावर भार येऊ नये म्हणून लोखंडी प्लेट देखील टाकली आहे. त्यामुळे काही अंशी वाहतूक कोंडी सुटणार असून या खड्ड्याच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला पडलेले खड्डे देखील बुजवावे अशी मागणी आहे.हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असल्याने त्यांची भूमिका महत्वाची आहे.

दत्तात्रेय भेगडे ( माजी सभापती,खेड बाजार समिती ) -

सकाळच्या बातमीमुळे खड्डा दुरुस्त होऊन तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे. उर्वरित खड्डे देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ बुजवावे.सर्व कामगार,प्रवासी,वाहतूकदार यांचे कडून प्रशासनास जागे केल्याबद्दल सकाळचे जाहीर आभार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com