निविदेतील त्रुटीमुळेच सिमाभिंतीचे काम रखडले;दोन वर्षांपूर्वी अंबिल ओढ्याच्या पुराने शहरात हाहाकार

ambil-odha-pune
ambil-odha-pune

पुणे (Pune News)- महापालिका (PMC) आणि सर्व्हे ऑफ इंडिया यांनी एकत्रित सर्व्हे करून आंबिल ओढ्याची हद्द निश्‍चित करणे, त्यानंतर अतिक्रमणे दूर करून सीमाभिंत बांधण्यासाठी निविदा काढणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता निविदा काढण्यात आल्याचे समोर आले आहे. आता मात्र काम सुरू करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार कोण, असा प्रश्‍न महापालिका वर्तुळात उपस्थित होत आहे. 

दोन वर्षांपूर्वी अंबिल ओढ्याच्या पुराने शहरात हाहाकार केला. अनेक ठिकाणच्या सीमाभिंत वाहून गेल्या. त्या घटनेवरून ओढ्यावरील आणि आतील अतिक्रमणे यांच्यावर चर्चा झडली. आता पुन्हा या ओढ्यावरील सीमाभिंत बांधण्यासाठीच्या कामाच्या हालचाली महापालिकेत सुरू झाल्या आहेत. वास्तविक या कामासाठी पाच महिन्यांपूर्वी महापालिकेने निविदा काढून काम दिले. ते सुरू झालेले नाही. दोन दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्‍तांची भेट घेऊन महापालिकेच्या जागेवरील सिमाभिंतीचे तरी काम सुरू करावे, अशी मागणी केली. 

याबाबत अधिक माहिती जाणून घेतल्यानंतर निविदा काढण्यापूर्वी महापालिकेने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने संपूर्ण ओढ्याचे सर्व्हेक्षण करून हद्द निश्‍चित करावी. त्यानंतरच निविदा काढून कामास सुरुवात करावी, असे ठरले होते. जेणेकरून भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून ओढ्यातील आणि त्यावरील अतिक्रमणे काढणे शक्‍य व्हावे. परंतु तसे न करता प्रशासनाने थेट निविदा काढण्यातच रस दाखविला. निविदा काढल्यानंतर ठेकेदार कंपनीला काम देऊन पाच महिने झाले. अद्याप कामाला सुरवात झाले नाही. संबंधित ठेकेदारावर महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे केवळ ठेकेदाराचे हित साधण्यासाठीच या निविदा काढण्यात आल्या होत्या का, झालेली चूक झाकून सिमाभिंतीच्या काम सुरवात करण्यास प्रशासन प्राधान्य देणार की नवीन निविदा काढणार, कामाला उशीर केल्याबद्दल ठेकेदारावर काय कारवाई करणार का, असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. 

 पाच महिन्यांपूर्वीच या निविदा काढण्यात आल्या आहेत. संबंधित ठेकेदाराने काम सुरू का केले नाही, याबाबत विचारणा करण्यात आली आहे. त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. सीमाभिंतीच्या कामासाठी विकास आराखडा आणि प्रायमुव्ह संस्थेचा अहवाल विचारात घेतला आहे. 
सुरेश जगताप (अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे महापालिका) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com