फलोदे भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध

चंद्रकांत घोडेकर
बुधवार, 16 जानेवारी 2019

घोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स फाऊंडेशन पुणे आणि आदिम संस्कृती संस्था फलोदे यांच्या एकत्रित सहकार्यातून रूग्णवाहिका उपलब्ध केली आहे. या रुग्णवाहिकेचे स्थानिक संयोजन शहीद राजगुरू ग्रंथालय फलोदे हि संस्था करणार आहे.

घोडेगाव (पुणे): फलोदे (ता. आंबेगाव) या भागातील रूग्णांना तातडीच्या वेळेस रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कंपेटीटोर्स फाऊंडेशन पुणे आणि आदिम संस्कृती संस्था फलोदे यांच्या एकत्रित सहकार्यातून रूग्णवाहिका उपलब्ध केली आहे. या रुग्णवाहिकेचे स्थानिक संयोजन शहीद राजगुरू ग्रंथालय फलोदे हि संस्था करणार आहे.

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात आजही अनेक गावे, वाड्या-वस्त्या यांना मूलभूत आरोग्याच्या सुविधा प्राप्त झालेल्या नाहीत. या भागातील रुग्णांना अनेक वेळा वेळेत दवाखान्यात वेळेत पोहचविता न आल्यामुळे रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या भागात 108 ची रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी किसानसभेच्या माध्यमातून ऑगस्ट 2018 मध्ये तीन दिवसांचे उपोषण झाले होते व त्यानंतर या भागात 108 ची रुग्णवाहिका उपलब्ध झाली होती. ही रुग्णवाहिका या भागात उपलब्ध झाली असली तरी या एका रुग्णवाहिकेवर येणारी रुग्णांची संख्या लक्षात घेता या भागात अजून एका रुग्णवाहिकेची अत्यंत गरज होती. ही गरज लक्षात घेऊन या भागासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे.

यावेळी आयआरबी कंपनीचे जनरल मॅनेजर रविंद्र वायाळ, रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे च्या अध्यक्षा श्रीमती नाईक, डॉ. संजयकुमार भोसले, राहुल वाणी, किशोर म्हसवडे, अनिल पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले, डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण दरक, सोलापूर स्मार्ट सिटीचे संचालक चंद्रशेखर पाटील, धर्मादाय आयुक्त अहमदनगर कार्यालयातील अधिकारी किरण लोहोट, माजी नायब तहसीलदार विजय केंगले, सुरेश भवारी, सलीम तांबोळी, फलोदे गावच्या सरपंच मनीषा मेमाणे, सामाजिक कार्यकर्ते राजू घोडे, कृष्णा वडेकर इत्यादी उपस्थित होते. व्हॉट्सअँपचा ग्रुपवरील मित्रांनी एकमेकांना प्रतिसाद देऊन ही अॅम्ब्युलन्स या भागात दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश गवारी यांनी केले तर प्रास्ताविक अमोल वाघमारे व आभार माजी सरपंच अशोक पेकारी यांनी मानले.

Web Title: Ambulance to reach patients to the hospital at falode ghodegaon