esakal | पुणे महापालिकेचे सुधारित आदेश; असे असतील नवे निर्बंध
sakal

बोलून बातमी शोधा

Amended order of Pune Municipal Corporation  new restrictions

कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी पुणे शहरासाठी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी निर्बंधांचा नवा आदेश सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध केला. त्यात नेमके काय आहे?, याबाबत नागरिकांच्या मनातील प्रश्न आणि उत्तरे.

पुणे महापालिकेचे सुधारित आदेश; असे असतील नवे निर्बंध

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा


कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी पुणे शहरासाठी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी निर्बंधांचा नवा आदेश सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध केला. त्यात नेमके काय आहे?, याबाबत नागरिकांच्या मनातील प्रश्न आणि उत्तरे.

प्रश्न- नवे निर्बंध कधीपर्यंत राहणार?
उत्तर- नवे निर्बंध ५ एप्रिलपासून ३० एप्रिल २०२१ पर्यंत लागू राहतील.

प्रश्न- निर्बंधांच्या वेळा काय असतील?
उत्तर- सोमवार ते शुक्रवारपर्यंत दररोज सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी असेल, शुक्रवारी सायंकाळी ६ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत (विकेंड लॉकडाउन) असेल. संचारबंदी आणि विकेंड लॉकडाउनच्या काळात नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी असेल.
 

हेही वाचा - पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका

प्रश्न- विकेंड लॉकडाउन कसा असेल?
उत्तर- शुक्रवारी सायंकाळी ६ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असेल. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा, त्यांच्याशी संबंधित दुकाने सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा वगळता वाहतूक बंद असेल. तसेच, नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासही बंदी असेल. मात्र, अत्यावश्यक कारण आणि बाहेरून येणाऱ्या प्रवाशांसाठी रिक्षा, कॅब, रेल्वे, एसटी, विमान वाहतूक सुरू असेल.

प्रश्न- घरेलू कामगार, सोसायट्यांतील कामगारांवर कोणते निर्बंध आहेत का?
उत्तर- घरेलू कामगारांना कामावर जाता येईल. मात्र, त्यांनी आरटीपीसीआर चाचणी किंवा लसीकरण करणे आवश्यक आहे.

हेही वाचा - पुण्यात रेमडिसिव्हिरचा पुन्हा काळा बाजार!

प्रश्न- सोमवार ते रविवार शहरात काय सुरू राहणार?
उत्तर- अत्यावश्यक सेवा आणि संबंधित दुकाने तसेच भाजी मंडई, रुग्णालये, डायग्नॉस्टिक सेंटर, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, आनुषंगिक सेवा, किराणा, भाजीपाला, डेअरी, बेकरी, स्वीट मार्ट, प्रवासी बस, कॅब, रिक्षा, रेल्वे, एसटी, विमान, मालवाहतूक, ई- कॉमर्स, वृत्तपत्रे कार्यालये आणि पेट्रोल पंप.

प्रश्न- सोमवार ते रविवार शहरात काय बंद राहणार
उत्तर- सर्व प्रकारची दुकाने, मॉल, उद्याने, मैदाने, जिम, स्वीमिंग पूल, सलून, ब्यूटी पार्लर, खासगी क्लास आदी.

डॉक्टरांनो, रुग्णांची काळजी घ्या! महापालिकेची खासगी डॉक्टरांना तंबी

प्रश्न- पार्सल सर्व्हिस सुरू राहणार का?
उत्तर- सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार. मात्र, विकेंड लॉकडाउनमध्ये म्हणजे शुक्रवारी सायंकाळी ६ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत घरपोच सेवा सुरू राहतील. त्या काळात हॉटेलमध्ये जाऊन पार्सल आणण्याची सुविधा राहणार नाही.

प्रश्न- वाहतुकीवर काय निर्बंध असतील?
उत्तर- प्रवासी बस, सार्वजनिक बस, टॅक्सी, रिक्षा, रेल्वे, विमान वाहतूक सेवेचा समावेश अत्यावश्यक सेवेत केला आहे. त्यामुळे विकेंड लॉकडाउनमध्येही आवश्यक कारणांसाठी ही सेवा सुरू असेल.

प्रश्न- आंतरजिल्हा वाहतूक करता येणार का?
उत्तर- आंतरजिल्हा वाहतूक सोमवारी सकाळी ६ ते शुक्रवार सायंकाळी ६ पर्यंत करता येणार. मात्र, विकेंड लॉकडाउनमध्ये (शुक्रवारी सायंकाळी ६ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत) अत्यावश्यक कारणाशिवाय वाहतूक करता येणार नाही.

प्रश्न- रिक्षा, कॅब, चारचाकी वाहनांत प्रवासी किती असतील?
उत्तर- रिक्षात चालक आणि दोन प्रवासी, कॅब आणि मोटारींमध्ये चालक आणि प्रवासी क्षमतेच्या निम्मे प्रवासी.

प्रश्न- पीएमपी सुरू राहणार का?
उत्तर- पीएमपीची सेवा संपूर्णतः बंद राहणार. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी पीएमपी सुरू राहणार.

प्रश्न- दहावी, बारावीचे काय ?
उत्तर- दहावी, बारावीचे वर्ग सुरू राहतील, अन्य वर्गांच्या शाळा, महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार.

प्रश्न- खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू राहणार का?
उत्तर- होय. पण, खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर अन्न पदार्थांचे सेवन करण्यास बंदी असेल. सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत पार्सल घेऊन जाण्यास परवानगी असेल. विकेंड लॉकडाउनमध्ये ते पूर्ण बंद असतील.

प्रश्न- उद्योग, बांधकामे सुरू राहणार का?
उत्तर- उद्योग, बांधकामे सुरू राहणार. उद्योग क्षेत्र पूर्ण क्षमतेने सुरू राहणार. बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची व्यवस्था आहे, असे बांधकाम सुरू राहणार. मात्र, उद्योग आणि बांधकामांना सर्व नियमांचे पालन करावे लागणार. कामगारांची आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार.

प्रश्न- कोणती कार्यालये सुरू राहणार?
उत्तर- सहकारी, राष्ट्रीयकृत, खासगी बॅंका, विमा कंपन्या, आयटी, वकील, सीए, महावितरण, दूरसंचार सेवा पुरवठादार, औषध कंपन्या, दूरसंचार सेवा पुरवठादार.

प्रश्न- कोणती कार्यालये बंद राहणार ?
उत्तर- सर्व खासगी कार्यालये बंद राहणार. त्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागणार.

प्रश्न- अंत्यसंस्कार, दशक्रिया विधीसाठी किती लोकांनी उपस्थित राहावे?
उत्तर ः अंत्यसंस्कार, दशक्रियाविधी आदींसाठी जास्तीत २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी.

प्रश्न- लग्नसमारंभ करता येणार का?
उत्तर- होय. लग्नाला ५० जणांची उपस्थिती. सर्वांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक.

loading image