

Amit Shah addresses the gathering at a cooperative project event in Pune.
पुणे : ‘‘काँग्रेस पक्षाला सलग तीन निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांच्यामध्ये नैराश्य आले आहे. याच नैराश्यातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आंतरराष्ट्रीय मंचावर जाऊन भारताची, देशाच्या विकासाची आणि पंतप्रधानांची बदनामी करीत आहेत. मात्र अशाप्रकारे देशाची बदनामी करून काँग्रेसला कधीही सत्ता मिळणार नाही,’’ असा घणाघात केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी केला.