Amogh Doshi : बारामतीचा अमोघ दोशी CA परिक्षेत देशात तिसावा

बारामती व पुणे येथे सुरवातीला काही काळ नोकरी व नंतर व्यवसाय करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
CA Amogh Doshi
CA Amogh DoshiSakal

Amogh Doshi - येथील अमोघ अजय दोशी (ढाकाळकर) यांनी नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया चार्टर्ड अकौंटंट परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. राष्ट्रीय स्तरावर बारामतीच्या अमोघने तिसावा क्रमांक प्राप्त करत बारामतीचा नावलौकीक द्विगुणित केला आहे.

दरवर्षी होणा-या चार्टर्ड अकौटंटच्या परिक्षेत देशभरातून लाखो विद्यार्थी नशीब आजमावतात. यंदा जवळपास अडीच लाख विद्यार्थी या परिक्षेला बसले होते.

CA Amogh Doshi
Mumbai Local : दंडाच्या नावाखाली रेल्वे प्रवाशाकडून साडेचार हजाराची वसुली! मात्र, दंडाची पावती नाही

त्या पैकी केवळ 9.5 टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण झाले. यात देशभरातून अमोघ यांचा तिसावा क्रमांक लागला आहे. पहिल्याच प्रयत्नात तो घवघवीत यश संपादन करीत उत्तीर्ण झाल्याने बारामतीकरांनी आनंद व्यक्त केला.

अमोघ यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र महाविद्यालयात झाले आहे. त्यांना या परिक्षेत 518 गुण मिळाले आहे.

CA Amogh Doshi
Mumbai News : वाकोला-सांताक्रूझ रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण

बारामती व पुणे येथे सुरवातीला काही काळ नोकरी व नंतर व्यवसाय करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या यशामध्ये आई वडील व पुण्यातील मार्गदर्शक चार्टर्ड अकौटंट रोहित मेहेंदळे यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com