पुणे : शहर सुधारणा बालवडकर तर महिला व बालकल्याण एकबोटेंकडे

pune.jpg
pune.jpg

पुणे : महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांची तर महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांची शनिवारी निवड झाली.

विधी समितीची जबाबदारी नगरसेवक योगेश समेळ आणि क्रीडा समितीचे अध्यक्षपद विजय शेवाळे यांच्याकडे आले आहे. महापालिकेच्या विषय समित्यांच्या निवडणुकीनंतर नव्या पदाधिकाऱ्यांची नावांची घोषणा करण्यात आली. 

महापालिकेच्या चार विषय समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने या समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसनेही उमेदवार उभे केले होते. मात्र, महापालिकेत भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने चारही समित्यांचे अध्यक्ष-उपाध्यक्षपद भाजपकडे राहणार आहे. तरीही, विरोधी पक्षांनी उमेदवार दिल्याने या पदांसाठी निवडणूक झाली, तित भाजपचे उमेदवार विजयी झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com