अमोल कोल्हे यांचा पदाचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

पुणे - नुकत्याच झालेल्या पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाल्याची जबाबदारी स्वीकारून शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या पदाचा शुक्रवारी राजीनामा दिला. परंतु, पक्षाने कोल्हे यांचा राजीनामा स्वीकारला नसून, त्यांना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आपल्या पदावर कायम राहत सक्रिय राहण्यास सांगण्यात आले, असे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

सेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याजागी डॉ. कोल्हे यांची जिल्हा संपर्कप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या कार्यकालात पक्षाची कामगिरी खालावली, याचीच जबाबदारी कोल्हे यांनी स्वीकारली.

Web Title: amol kolhe resign post