
जुन्नर : घोड प्रकल्प वनविभाग जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी प्रशांत खाडे यांनी पदभार स्वीकारला आहे. जुन्नर वनविभागात तीन वर्षांहून अधिक काळ काम करत असताना सातपुते यांनी बिबट समस्येचे आवाहन पेलले असून त्याचबरोबर जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यात अनेक महत्वाची कामे पूर्णत्वास नेली आहेत.