बंगालच्या उपसागरात 'अम्फान'ची तीव्रता वाढली; जाणून घ्या अपडेट्स

बंगालच्या उपसागरात 'अम्फान'ची तीव्रता वाढली; जाणून घ्या अपडेट्स

पुणे  : यंदाचा पहिला चक्रीवादळ हा बंगालच्या उपसागरात निर्माण झाला असून याला 'अम्फान' असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान या चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून, ते सूपर चक्रीवादळात रूपांतरित झाले आहे. तसेच गेल्या सहा तासांमध्ये 13 किलोमीटर प्रति तास या वेगाने चक्रीवादळाचा प्रवास उत्तर पूर्व दिशेने होत आहे. यांच्या वाऱ्यांची गती ही 220 ते 230 किलोमीटर प्रति तास इतकी आहे. तर येत्या 20 मे रोजी दुपारी हे चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडक देऊ शकेल. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान उत्तरेच्या दिशेने प्रवास सुरू असलेल्या या चक्रीवादळाची तीव्रता उद्यापाऊन थोडी कमी होऊन मग तो बुधवारी पश्चिम बंगालच्या दिघाला धडकेल. तसेच यावेळी वाऱ्यांचा वेग हा 165 ते 175 किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो. यावेळी ईशान्य भारतातील राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. सद्य परिस्थिती पाहता येत्या 24 तासांसाठी पश्चिम बंगाल व बांगलादेशलागतच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांना किनाऱ्यावर न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांना सावध राहण्यासाठी सांगण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे चक्रीवादळ 1999 नंतरचे पाहिले अतितीव्र चक्रीवादळ तयार झाले आहे. या पूर्वीच्या चक्रीवादळांची तीव्रता अम्फानच्या तुलनेत थोडी कमी होती. सद्य परिस्थिती पाहता येत्या 24 तासांसाठी पश्चिम बंगाल व बांगलादेशलागतच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांना किनाऱ्यावर न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांना सावध राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. येत्या तीन चार दिवसात उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट वाहणार असून या भागातील कमाल तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअस इतके असेल. त्याच बरोबर येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णनेतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

चक्रीवादळाची नाव
या वर्षीच्या चक्रीवादळाला 'अम्फान' हे नाव थायलंड या देशाने दिले आहे. 2004 ममध्ये 64 देशांनी दिलेल्या नावांच्या यादीतील हे शेवटचे नाव असून यावर्षीच्या पहिल्या चक्रीवादळाला देण्यात आले आहे. तसेच पुढील चक्रीवादळांना या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या यादीतून नावे दिली जातील. जागतिक हवामानशास्त्र संघटनेद्वारे जाहीर करण्यात आलेल्या या नवीन यादीत 169 नाव आहेत. यामध्ये निसर्ग, गती, निवार अशी अशा नावांचा समावेश आहे. अपदाच्या काळात पटकन सामान्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी तसेच लक्षात राहण्यासाठी अशा छोट्या नावांना निवडण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com