अमृता मिश्रा यांना मिसेस पॉप्युलर किताब 

अमृता मिश्रा यांना मिसेस पॉप्युलर किताब 

पुणे : पुण्याच्या अमृता देबाशिष मिश्रा यांनी सिंगापूर येथे झालेल्या "मिस अँड मिसेस इंटरनॅशनल' स्पर्धेत "मिसेस पॉप्युलर' हा किताब पटकावला. जगातल्या पंधरा देशांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत अमृता यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत 22 महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. अमृता यांनी संगणकशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. 

त्यांनी आयबीएम आणि पटणी या कंपन्यांमध्ये दहा वर्षे काम केले आहे. त्या "आहार व आरोग्य' याविषयी लोकांना मार्गदर्शन करतात. एका अयशस्वी वैवाहिक जीवनाच्या अनुभवानंतर निराश न होता त्यांनी आपले ध्येय गाठले आहे. नंतर काही वर्षे बालसंगोपनाची जबाबदारी सांभाळत त्यांनी धावपटु म्हणुन नाव कमावले. त्या उत्तम कवयित्री आहेत. सातारा हाफ मॅरेथॉन मध्ये त्या सहभागी होत असतात. महिला सक्षमीकरण, बालशिक्षण, पर्यावरण आणि आरोग्य या विषयाबाबत त्या जागरुक आहेत. 
अमृता म्हणाल्या, " भारतीय स्त्री म्हणुन माझ्या यशाबद्दल खुप अभिमान आहे. आता माझे लक्ष्य मिसेस युनिव्हर्स असणार आहे आणि भविष्यात अनेक समाजोपयोगी कार्य करण्याचा माझा मानस आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com