esakal | Video : देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीविषयी त्यांच्या 'गृहमंत्री' काय सांगतात?
sakal

बोलून बातमी शोधा

devendra.jpg

Video : देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीविषयी त्यांच्या 'गृहमंत्री' काय सांगतात?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : "देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडताना दोनशे टक्‍के झोकून देऊन काम केलंय. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यांची पुढील वाटचालही त्याच हिशेबाने होईल, याची मला खात्री आहे,'' असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्‍त केला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन 14 दिवस झाले आहेत. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. परंतु शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम असल्यामुळे सरकार स्थापनेचे घोडे अडले आहे. सध्या सरकार स्थापनेबाबत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. परंतु नेमके कोणाचे सरकार येईल याची कोणाला खात्री देता येत नाही.

या संदर्भात अमृता फडणवीस यांना विचारले असता त्या म्हणाल्या, "देवेंद्रजी यांनी 'न भूतो न भविष्यती' काम केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी आणि जनतेनेही विश्‍वास दाखवला आहे. त्यामुळे भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यांची पुढील वाटचालही तशीच होईल, याची मला खात्री आहे.''

loading image
go to top