Manchar News : महिलेच्या पोटातून दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून काढला तब्बल आठ किलोचा गोळा

मंचर येथील सार्थक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलला यश
eight kg lump was surgically removed from womans stomach
eight kg lump was surgically removed from womans stomachsakal

मंचर - सार्थक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी आलेल्या एका महिलेच्या पोटातून अंडाशयाचा तबल ८ किलोचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले. स्त्री व प्रसूतीशास्त्र विभागातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कल्याणी गाडे यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया तीन तासात केली. याकामी भूलतज्ज्ञ डॉ. प्रदीप भांगे, सार्थक हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत गाडे व डॉ. प्रितम गाडे ह्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

५० वर्षीय महिलेला पोटदुखीच्या वेदना होत होत्या. पोट फुगण्याचा त्रास काही महिन्यांपासून जाणवत होता. परंतु अचानक पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या व रक्तदाब कमी झाल्याने त्यांना सार्थक हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल केले. सोनोग्राफी व सी. टी. स्कॅन तपासण्या केल्या. अंडाशयाची २५ x २७ सेमी आकाराची मोठी गाठ निदर्शनास आली.

संभाव्य धोक्यांची रुग्णाच्या नातेवाईकांना कल्पना दिली. त्यांच्या परवानगीने शस्त्रक्रिया केली. महिलेचा जीव वाचला. शस्त्रक्रियेनंतर चार दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. नुकताच महिलेला डिस्चार्ज देण्यात आला आहे. योग्य उपचार करून जीवदान दिल्याबद्दल नातेवाईकांनी सर्व डॉक्टर, नर्सेस व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. हा ट्यूमर कसा तयार झाला. यासंदर्भात डॉक्‍टरांनी बायोप्सीसाठी हिस्टोपॅथॉलॉजीकडे तपासणीसाठी गोळा पाठविला आहे.

सार्थकमध्ये अतिदक्षता, डायलिसिस विभाग, सुसज्ज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, प्रसूती विभाग आणि पॅथॉलॉजी लॅब सुविधा आहेत. २४ तास अत्यावश्यक सेवा व तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आहे. मेंदू, मणक्याच्या, पोटाच्या, गर्भपिशवी, हाडे, किडनी विकारांवरील शस्त्रक्रिया, कॅन्सर व प्लास्टिक सर्जरी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत केल्या जातात. असे डॉ. प्रशांत गाडे यांनी सांगितले.

'ही गाठ ओव्हेरीयन म्युसिनस सिस्ट अडिनोमा ह्या प्रकारची असून भविष्यात त्याचे कॅन्सर मध्ये रूपांतर होण्याची शक्यता देखील असते. गाठीच्या खूप मोठ्या आकारामुळे दुर्बिणीद्वारे गाठ काढणे आव्हानात्मक होते. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केल्यामुळे रुग्णाला नंतर कमी त्रास व वेदना होतात. रुग्ण दैनंदिन कामकाजाला लवकर सुरुवात करू शकतात.'

- डॉ. कल्याणी गाडे, स्त्री रोग तज्ज्ञ व लॅपरोस्कोपिक सर्जन, सार्थक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, मंचर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com