अनाम प्रेम परिवाराची एअर होस्टेससोबत भाऊबीज

प्रेम शिंपीत जावे या भावनेने एकत्र येत अनाम प्रेम परिवारातील सदस्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. ही भाऊबीज पुणे विमानतळावरील स्पाइस जेट एअरलाइन्स कक्षात साजरी झाली.
अनाम प्रेम परिवाराची एअर होस्टेससोबत भाऊबीज
Summary

प्रेम शिंपीत जावे या भावनेने एकत्र येत अनाम प्रेम परिवारातील सदस्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. ही भाऊबीज पुणे विमानतळावरील स्पाइस जेट एअरलाइन्स कक्षात साजरी झाली.

पुणे - विमान प्रवासात एअर होस्टेसच्या सौजन्यपूर्ण वागण्यातून प्रवाशांना सुखरूपतेचा अनुभव येत असतो. त्यांच्याप्रती श्रद्धायुक्त भाव व्यक्त करण्यासाठी ‘अनाम प्रेम परिवारा’कडून एअर होस्टेस यांच्यासमवेत भाऊबीज साजरी करण्यात आली.

प्रेम शिंपीत जावे या भावनेने एकत्र येत अनाम प्रेम परिवारातील सदस्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. ही भाऊबीज पुणे विमानतळावरील स्पाइस जेट एअरलाइन्स कक्षात साजरी झाली. स्पाइस जेटच्या व्यवस्थापक अफसाना बन्नू यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात स्पाइस जेटच्या कॅप्टन, केबिन क्रूसह इतर सहकाऱ्यांनी आनंद सोहळ्यात भाग घेतला. स्पाइस जेट कंपनीतील संबंधित अधिकाऱ्यांनी याला चांगला प्रतिसाद दिला.

‘अनाम प्रेम परिवार’चे अमर काळे यांनी प्रास्ताविक केले. अनिल मोरे म्हणाले, ‘एअर होस्टेस यांचे कर्तव्य आणि त्यांची सेवा हेच त्यांचे खरे सौंदर्य आहे. अनाम प्रेम परिवारातील सदस्य एअर होस्टेसला ‘नभोमाता’ म्हणून संबोधतात. स्पाइसजेटच्या सर्व भगिनींनी अनाम प्रेम परिवाराच्या सदस्यांना औक्षण करून भाऊबीज साजरी केली. हे पवित्र नाते आजन्म जपण्याचा संकल्प करण्यात आला.’ ‘अनाम प्रेम परिवारा’तील भाविका काळे, सुरेश काळे, सुरेखा काळे, प्रणव पाठक, भक्ती पाठक, संतोष पाळेकर, अनिल मोरे, पंडित शिकारे, योगेश भंडारी, पल्लवी जोशी, अमित माळी आदी या वेळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com