ब्राम्हण महासंघात उभी फूट; नव्या संघटनेची घोषणा

Ananad dave Announce new Bramhan organization
Ananad dave Announce new Bramhan organization

पुणे : ब्राम्हण महासंघात फूट पडली असून ब्राम्हण महासंघाची नवीन संघटना स्थापन करण्यात आली आहे. तिला ब्राम्हण महासंघ असे नाव देण्यात आले आहे.

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हा निर्णय घेण्यात आला आहे. दसऱ्याचा शुभ मुहूर्त साधत आपण ब्राह्मण महासंघाची नवीन संघटना उभारली असल्याचे या नवीन संघटनेचे प्रमुख आणि संस्थापक आनंद दवे यांनी सांगितले आहे.

कोथरूड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिल्याने दवे यांची अखिल भारतीय ब्राम्हण महासंघातून हकालपट्टी करण्यात आली होती, त्या पार्श्वभूमीवर आनंद दवे म्हणाले, सध्याचे ब्राम्हण समाजाचे नेतृत्व विकले गेले आहे. सध्या समाज बांधवांची सध्याच्या नेतृत्वाविषयी नाराजी आहे.

नवीन संघटना बांधून खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचे काम करणार असून प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com