'इंटेरिअर डिझाइन्स'च्या प्रदर्शनाला कलाप्रेमींचा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 जानेवारी 2019

पुणे : प्रसिद्ध छायाचित्रकार आनंद दिवाडकर यांनी काढलेल्या, आकर्षक वास्तुशैलीच्या गृहरचना आणि वैविध्यपूर्ण इंटेरिअर डिझाइन्सच्या छायाचित्रांचे पहिले प्रदर्शन नुकतेच पुण्यात आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनातील छायाचित्रे पाहून नागरिक भारावून गेले होते.

पुणे : प्रसिद्ध छायाचित्रकार आनंद दिवाडकर यांनी काढलेल्या, आकर्षक वास्तुशैलीच्या गृहरचना आणि वैविध्यपूर्ण इंटेरिअर डिझाइन्सच्या छायाचित्रांचे पहिले प्रदर्शन नुकतेच पुण्यात आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनातील छायाचित्रे पाहून नागरिक भारावून गेले होते.

घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनामधील राजा रविवर्मा कलादालन येथे प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन जागतिक कीर्तीचे वास्तुविशारद ख्रिस्तोफर बेनिंजर यांच्या हस्ते झाले. कलाप्रेमी नागरिकांसह अनेक नामवंत कलाकार, कला क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनाला कलाप्रेमी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

श्री. दिवाडकर गेली दोन दशके डिझाइन फोटोग्राफी या क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक डिझायनर्ससाठी त्यांनी फोटोग्राफी केली असून, त्यांनी काढलेले छायाचित्रे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नियतकालिकांमध्येही प्रसिद्ध झाले आहेत.

'मी फोटोग्राफी केलेल्या हजारो छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करणे हे अवघड काम होते. तरीही माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ज्यांच्यासोबत मी काम केले किंवा ज्यांच्या सुरुवातीपासून मी त्यांच्यासाठी काम केले, अशा वेगवेगळ्या 30 डिझायनर्सच्या कामांची मी काढलेली छायाचित्रे या प्रदर्शनात मांडली होती. त्यात अनेक दिग्गज, तसेच नव्याने उदयाला येत असलेले आर्किटेक्‍ट्‌स आणि डिझायनर्सच्या कामाचा समावेश होता,' अशी माहिती आनंद दिवाडकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anand Diwadkars interior exhibition at pune

फोटो गॅलरी