चिखली ‘आरटीओ’ची सूत्रे आनंद पाटलांच्या हाती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

अशी नवीन इमारत
    ठिकाण : पेठ सहा, मोशी- प्राधिकरण
    खर्च : आठ कोटी १० लाख रुपये 
    सुविधा : प्रशस्त वाहनतळ व २५० बाय ६ मीटरचा अत्याधुनिक ब्रेक टेस्टिंग ट्रॅक

मोशी - पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांची कराडला बदली झाली असून त्यांच्या जागी आनंद पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी बुधवारी (ता. १२) शिंदे यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. 

त्या वेळी पाटील म्हणाले, ‘‘पिंपरी- चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज पुढील महिन्यात मोशी- प्राधिकरणातील नवीन प्रशासकीय इमारतीमधून सुरू होईल.’’ शिंदे म्हणाले, ‘‘कार्यालयीन कामकाज सुरळीत करण्याचा आणि नवीन प्रशासकीय इमारतीतील कामांचा पाठपुरावा केला आहे.’’

Web Title: Anand Patil new Pimpri-Chinchwad Regional Transport Officer