
पुणे : घरीच बनवलेले विसर्जन कुंड, त्यात फुलांच्या पाकळ्या आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष करीत भक्तीपूर्ण वातावरणात घरातील गणरायाचे सहकुटुंब घरातच विसर्जन करण्यात येत आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरी गणपती बसवत असलेल्या भक्तांनी घरात, टेरेसवर किंवा सोसायटीने निर्माण केलेल्या विसर्जन हौदात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास पसंती दिली. त्यामुळे दर वर्षी विसर्जन मार्गांवर निर्माण होत असलेले भक्ती भावाचे वातावरण आणि गणरायाचा जयघोष यावर्षी घराघरात आणि सोसायट्यांमध्ये गुंजला.
दरवर्षीप्रमाणे यंदा वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढत गणरायाला विसर्जन घाटावर निरोप न देता आल्याचे दुःख भक्तांच्या मनात आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडून विसर्जन मिरवणूक काढत गणपतीचे विसर्जन करणे स्वतःच्या आणि समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याने व विसर्जनबाबत प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन व्हावे म्हणून यंदा घरीच गणेश मूर्तीचे विसर्जन केले. कोरोनाचे संकट समूळ नष्ट झाल्यानंतर पुढील वर्षी पुन्हा जोमाने आणि तितक्याच उत्साहात गणपती बाप्पाची स्थापना करू, अशी भावना गणेश भक्तांनी व्यक्त केली आहे.
सोसायट्यांमध्ये सामाजिक अंतर पाळून विसर्जन :
शहरातील काही सोसायट्यांत पार्किंगमध्ये गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्या ठिकाणी मूर्तीचे विसर्जन करत असताना सामाजिक अंतर पाळत मास्क लावून व कोरोना विषयक सर्व खबरदारी घेऊन मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर अनेकांनी महापालिकेच्या फिरत्या विसर्जन हौदात विसर्जन केले.
कोरोनामुळे घराच्या बाहेर पडून गणरायाचे सार्वजनिक ठिकाणी विसर्जन करणे यंदा शक्य नाही. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही घरच्या गणपतीचे घरातच सहकुटुंब भक्तीमय वातावरणात विसर्जन केले. फुलांची आरास करून विसर्जन कुंड सजवण्यात आला होता. शाडूच्या मूर्तीची पुन्हा माती झाल्यानंतर ती आम्ही झाडांसाठी वापरणार आहोत.
- दिनेश घोलप, टिंगरेनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.