घास रोज अडतो ओठी, सैनिक हो... (व्हिडिओ)

घास रोज अडतो ओठी, सैनिक हो... (व्हिडिओ)

पुणे - ‘‘पुलवामामध्ये चाळीस जवान हुतात्मा झाल्यानंतर मला तीन दिवस झोप आली नाही, त्या जवानांच्या कुटुंबांचे काय होणार, या प्रश्‍नाने डोळ्यांत सतत पाणी येत होते. त्यांच्यापर्यंत माझी पंधरा लाख रुपयांची मदत पोचावी, यासाठी मी धनादेश घेऊन ‘सकाळ’कडे आलोय...’’

पुण्यातल्या प्रसिद्ध साने डेअरीचे मालक अनंत साने सांगत होते. पंचाऐंशी वर्षांचे असलेल्या साने यांच्या हालचालींवर बंधने आहेत. तरीही ते रिक्षात निग्रहाने बसून तडक ‘सकाळ’ कार्यालयाकडं निघाले. शिवजयंतीच्या मिरवणुकीमुळे रिक्षा दूर सोडावी लागली. साने डेअरीचे सल्लागार विवेक पेठकर यांच्या मदतीने चालत त्यांनी ‘सकाळ’ कार्यालय गाठले. 

‘‘आपण समाजाचे देणे लागतो आणि त्या भावनेतूनच मी जवानांच्या कुटुंबांना मदत करायचं ठरवले,’’ असे साने यांनी सांगितले. 

व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांवर समाजाचाही हक्क आहे, असे साने म्हणाले. दुष्काळ, पाणीटंचाई, माळीणची घटना अशा अनेक प्रसंगी त्यांनी सढळ हाताने लाखो रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.

‘सकाळ’वर असणाऱ्या विश्‍वासामुळे मी इथपर्यंत आलो आहे. कारण ‘सकाळ’कडे सोपवलेली मदत योग्य लोकांपर्यंत पोचते, याची मला पूर्ण खात्री आहे. याआधीही मी सामाजिक कामासाठीची मदत ‘सकाळ’कडेच दिलेली होती,
- अनंत साने

मदतीचे आवाहन
जवानांच्या कल्याणासाठी कायमस्वरुपी आणि दीर्घकाळ टिकणारे काम उभे करण्याचा ‘सकाळ रिलीफ फंडा’चा विचार आहे. वसतीगृह, रुग्णालय अथवा अशा स्वरूपाचे काम रिलीफ फंडामार्फत केले जाईल. त्यासाठी समाजातील सर्व दानशुरांना ‘सकाळ रिलीफ फंडा’मार्फत मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. आपली मदत सकाळ रिलीफ फंड 
IDBI Bank ४५९१००१००१३०२६,
IFSC code IBKL०००४५९.  या मदतीस प्राप्तिकराची  ‘८० जी’ ही सवलत उपलब्ध आहे. याशिवाय ‘सकाळ’ च्या बुधवार पेठ कार्यालयात धनादेश वा रोख रक्कम स्वीकारली जाईल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com