राजकीय आखाडा रंगला मात्र, शेवटी वेल्हे पंचायत समितीच्या उपसभापती अनंता दारवटकरच

राजकीय आखाडा रंगला मात्र, शेवटी वेल्हे पंचायत समितीच्या उपसभापती अनंता दारवटकरच

वेल्हे : काॅंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरच अपक्ष म्हणून निवडून आलेले अनंता रेवन्नाथ दारवटकर यांची पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक रेवन्नाथ दारवटकर यांचे सुपुत्र व पंचायत समिती सदस्य अनंता दारवटकर यांनी सकाळी काॅंग्रेस पक्षाचा सदस्यत्वाचा फॅार्म भरुन पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर
वेल्हे पंचायत समिती सभागृहात उपसभापती निवडीची प्रक्रिया आज (ता. २२ रोजी) पार पडली.

प्रांतधिकारी राजेंद्र जाधव, तहसिलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, साहय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी निवड प्रक्रीयेचे काम पाहीले.

उपसभापती पदासाठी केवळ अनंता रेवन्नाथ दारवटकर यांचा एकमेव अर्ज आला होता. यासाठी सूचक या पंचायत समितीच्या सदस्या संगीता जेधे व विद्यमान सभापती दिनकर सरपाले होते. यावेळी प्रांतधिकारी राजेंद्र जाधव यांनी उपसभापतीपदी अनंता दारवटकर यांचे नाव घोषित केले.

विधानसभेच्या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक रेवन्नाथ दारवटकर यांनी मदत केल्याने आमदार थोपटे यांनी त्याचे चिरंजीव पंचायत समिती सदस्य अनंता दारवटकर यांना सभापतीपद देण्याचा शब्द दिला होता. परंतू काॅंग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या पंचायत समिती सदस्यांनी आमदारांचा आदेश झुगारुन सभापतीपदी काॅंग्रेसचेच दिनकर सरपाले यांना सभापतीपदी विराजमान केले होते.

या दरम्यान आमदार व पचायत समिती सदस्यांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला होता. दरम्यान, उपसभापती सीमा राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यांने उपसभापतीपद रिक्त झाले होते. याबाबत 'सकाळ'च्या 'सरकारनामा'मध्ये आमदार संग्राम थोपटे विधानसभेवेळी दिलेला शब्द पाळणार का? असे वृत्त प्रसिद्ध होताच थोपटे यांनी पंचायत समिती सदस्य
व तालुका कॅाग्रेस कार्यकारीणीची तातडीची बैठक गुरूवार (ता. २१) रोजी राजगड कारखान्याच्या सभागृहात बोलाविली होती.

यावेळी जर अनंता दारवटकर यांनी काॅंग्रेस पक्षात
प्रवेश केला तरच शब्द पाळला जाईल यावर एकमत झाले. यानुसार आज (ता. २२ रोजी) सकाळी आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थित पंचायत समिती सदस्य अनंता दारवटकर
यांनी कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केला. त्यानंतर अनंता दारवटकर यांच्या गळ्यात उपसभापतीपदाची माळ घातली.

यावेळी दिनकर सरपाले, अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, दिलीप बाठे, संदीप नगिने, शोभा जाधव, सीमा राऊत, संगीता जेधे, चंद्रकांत शेंडकर, नाना राऊत, शिवराज शेंडकर, शिवाजी चोरघे, भाऊ दसवडकर, दिलीप लोहकरे, संतोष मोरे आदी उपस्थित होते.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com