Video : कॉंग्रेसमधील असंतोषाची चौकशी करावी : अनंतराव थोपटे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 January 2020

कॉंग्रेस भवन फोडल्याच्या प्रकाराचा निषेध आहे. पण, आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळात डावलल्यामुळे जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला असून, पक्षश्रेष्ठींनी याची बारकाईने चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी केली.

भोर : कॉंग्रेस भवन फोडल्याच्या प्रकाराचा निषेध आहे. पण, आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळात डावलल्यामुळे जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला असून, पक्षश्रेष्ठींनी याची बारकाईने चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनंतराव थोपटे म्हणाले, "मी गेल्या 50 वर्षांपासून कॉंग्रेस पक्षाची बांधीलकी पत्करली असून, सोनिया गांधी यांच्याशी एकनिष्ठ आहे. हीच शिकवण माझ्या मुलांना दिलेली आहे. मंत्रिमंडळात निवडण्यासाठीच्या निकषांचे पालन कॉंग्रेसकडून करण्यात आले नाही. शेवटच्या क्षणी आमदार संग्राम थोपटे यांना डावलण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. भोर मतदारसंघातील भोर, वेल्हे व मुळशी तालुक्‍यातील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन याचा निषेधही केला आहे. पक्षश्रेष्ठींनी याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.''

राज्यात कॉंग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी अध्यक्षा सोनिया गांधी यांना प्रथमच महाराष्ट्रात आणून सभा घेतली. त्या वेळच्या निवडणुकीत राज्यात कॉंग्रेसचे सरकार आले. परंतु, माझा बळी गेला. तरीही. मी कॉंग्रेस जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, मी पक्षबदल न करता पुन्हा जोमाने कामाला लागलो. सन 1980 ते सन 1990 या कालावधीमध्ये एस. कॉंग्रेस आणि सन 1999 नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस उदयास आली. त्या वेळेपासून मी कॉंग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठीच काम केले. परंतु, सध्या याचा विसर पडलेला दिसत आहे,'' असे अनंतराव थोपटे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anantarao Thopte demnds inquiry of dissatisfaction in Congress