'अंगणवाडी कर्मचारी मानधनवाढीचा प्रस्तावावर गांभिर्याने विचार'

डी. के. वळसे पाटील
गुरुवार, 13 जून 2019

मंचर (पुणे) : "अंगणवाडी कर्मचार्यांसाठी मानधनवाढीचा प्रस्ताव अंतिम करण्याचे व आर्थिक तरतुदीसाठी पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येईल. तसेच कृती समितीने दिलेल्या मासिक पेन्शनच्या प्रस्तावावर गांभिर्याने विचार करण्यात येणार आहे. 19 जूनला होणाऱ्या प्रशासकीय बैठकित चर्चा करून अंतिम मान्यतेसाठी प्रस्तवा मंत्रीमंडळासमोर ठेवण्यात येईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता.11) आझाद मैदान, मुंबई येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. पाच हजार अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. केंद्रीय मानधनवाढीची अंमलबजावणी इतर राज्यांच्या प्रमाणे करावी. मानधन व मानधनाच्या निम्मी मासिक पेन्शन, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा देण्यात यावा, केंद् सरकारने दीड हजार रुपयांची वाढ केली आहे. त्याची राज्य सरकारने अमलबजावणी करावी, लाभाथीना चांगला प्रतिचा आहार देण्यात यावा. या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी आंदोलनाचे नेतृत्व कृती समितीचे निमंत्रक डॉ. एम.ऐ.पाटील साहेब, सरचिटणीस बिजृपॉल सिंह, राजेश सिंह, सुयॆमनी गायकवाड, निलेश दातखिळे, विष्णू अंबे, भगवान दवणे, राजु लोखंडे, भानदास पाटील, मुंकुद कदम, शततारका काटकाडे, अरूणा अलोने, सुष्मा चव्हाण, शारदा शिंदे यांनी केले. त्यानंतर शिष्टमंडळाने पंकज मुंडे, महिला व बालविकास विभागाचे सचिव विनिता वेद सिंघल, आयसीडीएस आयुक्त इंद्रा मालो व अन्य अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मानधनवाढ पूर्णपणे देण्याचे मुंडे यांनी मान्य केले. त्यासाठी आर्थिक तरतुदही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या कक्षात बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेत एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कलावती पोटकुले, भगवानराव देशमुख व सुवर्णा तळेकर, जीवन सुरुडे यांनी भाग घेतला. मानधनवाढ व पेन्शन मंजूर करून घेण्यासाठी कृती समितीमधील सर्व संघटनांनी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anganwadi employee salary issue seriously taken says pankaja munde