

Protest March Held in Shingave After Alleged Molestation of Four-Year-Old Girl
esakal
-नवनाथ भेके
निरगुडसर: शिंगवे(ता.आंबेगाव)येथे चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले. गावातील ग्रामस्थ व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने रविवारी सायंकाळी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बहुसंख्येने गावातील नागरिक व महिला व तरुण,विविध संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी मोर्चादरम्यान गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.