

Citizens’ Anger Boils Over in Loni Kalbhor; Sit-In Agitation Turns Aggressive
Sakal
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन : लोणी काळभोर (ता. हवेली ) परिसरातील मागासवर्गीय नागरिकांची घरे गेली पन्नास वर्षे शासनाच्या नावे नियमित न झाल्याने अखेर नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. यासोबतच लोणी काळभोर–रामदरा या ५२०० मीटर रस्त्याच्या भूसंपादनातील कथित भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे काम आणि शेतकऱ्यांची झालेली फसवणूक या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ठिय्या आंदोलन छेडले आहे.