खासदार अनिल शिरोळे यांचे पाण्यासाठीचे उपोषण स्थगित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

पुणे : पाणी कपातीच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या खासदार अनिल शिरोळे यांनी उपोषण मागे घेतले आहे. शिवाजीनगर भागात पाणीपुरवठा नियमितपणे होत नसल्याच्या निषेधार्थ परिसरातील रहिवाशांनी खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्यालयात बसून शुक्रवारी सायंकाळी तीन तास ठिय्या आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत ते सुरू होते. दरम्यान, शहरातील पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेत शनिवारी सकाळी अकरा वाजता उपोषण करणार असल्याचे खासदार शिरोळे यांनी जाहीर केले होते. याबाबत महापौर मुक्ता टिळक यांच्या विनंती नंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय शिरोळे यांनी घेतला. 

शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, दीपबंगला चौक, पोलिस वसाहत आदी भागांत सध्या पाण्याचा अनियमित पुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ आहेत. आजही सायंकाळी पाणी न आल्यामुळे रहिवाशांनी शिरोळे यांच्या जंगली महाराज रस्त्याजवळील कार्यालयात धाव घेतली.सायंकाळी सहा वाजल्यापासून त्यांनी तेथे आंदोलन सुरू होते,.

शिरोळे यांनी महापौर मुक्ता टिळक, आयुक्त सौरभ राव यांच्याशी संपर्क साधला तरीही पाणीपुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे आज (ता.27) सकाळी 11 वाजता महापालिकेत उपोषणाला बसणार असल्याची भूमिका खासदार अनिल शिरोळे यांनी घेतली होती. याबाबत महापौर मुक्ता टिळक यांच्या विनंती नंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. खासदार अनिल शिरोळे यांनी उपोषण स्थगित केले असून उद्या महापौर व आयुक्त यांच्याबरोबर, पाणीकपात संबंधी बैठक होणार आहे.

Web Title: Anil Shirole has withdrawn his fast for water crisis