...आता सेवा जित्राबांची

पाण्याने भरलेल्या पंपासह (उजवीकडे) माजी सैनिक सूर्यकांत कदम.
पाण्याने भरलेल्या पंपासह (उजवीकडे) माजी सैनिक सूर्यकांत कदम.

पुणे - सिंहगड किल्ल्याच्या परिसरात सध्या दुष्काळाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. डोंगरभागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. माणसाची ही व्यथा असताना जनावरांची पाण्यासाठी असलेली व्याकुळता शब्दांमध्ये वर्णन करणे कठीण आहे. परंतु नांदोशी येथे राहणारे माजी सैनिक  सूर्यकांत मारुती कदम हे गेल्या पंधरा वर्षांपासून मुक्‍या जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करत आहेत.

शेतीला पाणी कमी पडत असल्याने त्यांनी काही वर्षांपूर्वी बोअरवेल घेतली होती. सुदैवाने त्या बोअरवेलला खूप पाणी लागले. तेव्हापासूनच त्यांनी निर्णय घेतला व पाण्याचे मोठे व काही छोटे पिंप दररोज न चुकता परिसरातील जनावरांसाठी भरून ठेवू लागले. आजूबाजूचा परिसर जंगलाचा असल्याने हरिण, ससे, भेकर, मोर तसेच इतर जंगली प्राणी व पक्षीसुद्धा कदम यांनी व्यवस्था केलेल्या पाण्यावर आपली तहान भागवतात.

सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर कदम हे एका कंपनीत नोकरी करत आहेत. त्यामुळे त्यांना वेळ नसल्याने त्यांची मुले रमेश व राकेश हे दोघेही कंटाळा न करता जनावरांसाठी पाणी भरून ठेवतात. परिसरामध्ये सर्वोत्कृष्ट भातशेती करणारे कुटुंब म्हणून कदम परिवाराची ओळख आहे. परिसरातील कोणाचीही जनावरे आली तरी कोणाचेही मन दुखावले जात नाही. सैन्यामध्ये असताना छाती फुगवून भारतमातेची सेवा केली. आता मन मोठे करून समाजाची सेवा करत राहायची हे कदम स्वाभिमानाने सांगतात. बदलती जीवनशैली व वाढते शहरीकरण यामुळे कमी होत चाललेल्या माणुसकीला पुन्हा जिवंत करणारे माजी सैनिक सूर्यकांत कदम यांचे हे कार्य खरोखरच सर्वांना अंतर्मुख करणारे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com