नगर : माहिती अधिकार अबाधित राहण्याची प्राण पणाला लावेल अण्णा हजारे ः उपोषणाचा इशारा, माहिती आयक्तासोबत बुधवारी चर्चा

नगर : माहिती अधिकार अबाधित राहण्याची प्राण पणाला लावेल अण्णा हजारे ः उपोषणाचा इशारा, माहिती आयक्तासोबत बुधवारी चर्चा
Published on

माहिती अधिकाराची धार बोथट
केल्यास प्राणाची आहुती देईन

पाच जुलैपासून बेमुदत उपोषणाचा अण्णा हजारे यांचा इशारा

अहिल्यानगर : माहिती अधिकार कायद्यातील (आरटीआय) दुरुस्त्यांरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत ५ जुलैपासून राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
‘माहिती अधिकाराची धार बोथट केल्यास प्राणाची आहुती द्यावी लागली तरी आपण तयार आहोत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
माहिती अधिकार कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्त्यांवर तीव्र आक्षेप घेत हजारे म्हणाले, की या देशात जनता मालक आहे आणि अधिकारी हे सेवक आहेत. मात्र सध्या अधिकारीच मालक झाल्यासारखे वागत असल्याने आम्हाला पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. सध्याच्या राजकारणात तत्त्व आणि निष्ठा उरलेली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
माहिती अधिकारातील दुरुस्त्यांविरोधात हजारे यांनी यापूर्वीच ५ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्यासोबत सोमवारी (ता. २२) उशिरापर्यंत चर्चा झाली. बुधवारी (ता. २४) पांडे पुन्हा राळेगणसिद्धी येथे येऊन चर्चा करणार असून, त्यानंतर हजारे पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
हजारे यांच्या मते, माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्तींमुळे अर्ज शुल्कवाढ, ओळखपत्राची सक्ती, अतिरिक्त निर्बंध तसेच पुनरावृत्ती अर्ज निकाली काढण्याच्या तरतुदींमुळे माहिती मिळवण्याची प्रक्रिया अधिक तांत्रिक, कायदेशीर आणि गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळे पारदर्शकतेलाही धक्का बसत असून, सरकारचा माहितीचा अधिकार अधिक सक्षम करण्याचा हेतू दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
या वेळी राज्य आणि देशातील पक्षांतराच्या राजकारणावरही त्यांनी टीका केली. वारंवार पक्ष बदलणाऱ्या नेत्यांकडे कोणतेही ठोस ध्येय नसते. केवळ वैयक्तिक हितसंबंध आणि स्वार्थासाठीच अशा प्रकारचे पक्षांतर केले जात असल्याचे हजारे म्हणाले.
----------------------------------------

माहिती अधिकार अबाधित
राहण्याची प्राण पणाला लावेल

अण्णा हजारे ः उपोषणाचा इशारा, माहिती आयक्तासोबत बुधवारी चर्चा

अॅग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा ५ जुलैपासून राळेगण सिद्धी (ता. पारनेर) येथे बेमुदत उपोषण कऱण्याचा इशारा दिला आहे. देशात लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीला आपण विरोध करू शकत नाही. मात्र, सध्या जे राजकारण सुरू आहे, त्यात तत्त्व, निष्ठा शिल्लक राहिलेली नाही असा संताप व्यक्त करतानाच माहिती अधिकार अबाधित राहण्यासाठी प्राणाची अहुती देण्याची वेळ आली तरी आपली तयारी असल्याचे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.
माहिती अधिकार कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्त्यांविरोधात हजारे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘या देशात जनता मालक आहे आणि अधिकारी हे सेवक आहेत. मात्र सध्या अधिकारीच मालक झाल्यासारखे वागत असल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग निवडला आहे,’ अशा कडक शब्दांत हजारे यांनी प्रशासकीय यंत्रणेवर हल्लाबोल केला.
माहिती अधिकारात दुरुस्तीला विरोध करत हजारे यांनी ५ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्याशी सोमवारी (ता. २२) उशिरा चर्चा झाली. पुन्हा बुधवारी (ता.२४) पुन्हा पांडे राळेगणसिद्धी येथे येऊन चर्चा करणार आहेत. त्यानंतर अण्णा पुढील भूमिका मांडतील. जर हजारे यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही हजारे यांनी सरकारला दिला आहे. माहिती अधिकार कायद्याच्या दुरुस्तीमुळे माहिती अर्जाची शुल्क वाढविणे, ओळखपत्र सक्ती, अर्जावर अतिरिक्त निर्बंध, पुनरावृत्ती अर्ज निकाली काढण्याच्या तरतुदीमुळे माहिती मिळवण्याची प्रक्रिया अधिक तांत्रिक, कायदेशीर, गुंतागुंतीची व पारदर्शकता कमी झाली आहे. यातून सरकारचा माहितीचा अधिकार मजबूत करण्याचा हेतू नाही असे ते म्हणाले. सध्या राज्यातील आणि देशातील ‘फोडाफोडीच्या राजकारणा’वर आणि नेत्यांच्या पक्षांतरावर हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नेत्यांनी वारंवार पक्ष बदलणे बरोबर नाही. अशा नेत्यांना कोणतेही ध्येय नसते, केवळ स्वतःचे वैयक्तिक हित आणि स्वार्थ साधण्यासाठीच हे लोक पक्ष बदलत असल्याची टीका त्यांनी या वेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com