esakal | विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
sakal

बोलून बातमी शोधा

विद्या प्रतिष्ठान इंदापूर स्कूल

विद्या प्रतिष्ठान इंदापूर स्कूल मध्ये गांधी व शास्त्री यांची जयंती

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्मदिन एकाच दिवशी येणे हा दुग्धशर्करा योग आहे .महात्मा गांधी यांचा देश बलवान करण्या साठी खेडी बलवान करणे तसेच लालबहादूर शास्त्री यांचा जय जवान जय किसान या संदेशाची अंमल बजावणी झाली तरच देश जागतिक सत्ता म्हणून निश्चित पुढे येईल असा विश्वास विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या ज्योती जगताप यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: खळबळजनक! 'शिवसेना नेत्यानेच परबांविरोधातील माहिती सोमय्यांना पुरविली?'

इंदापूर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य ज्योती जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

यानिमित्त विद्यालयात ऑनलाईन सुंदर हस्ताक्षर ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली. प्रथम गट इयत्ता पाचवी ते सातवी व द्वितीय गट इयत्ता आठवी ते बारावी तर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्याकरता पणती बनवणे हा उपक्रम घेण्यात आला. या थोर नेत्यांना श्रद्धांजली म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घराभोवतीचा परिसर व घर स्वच्छ केले. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन वैभव चव्हाण व निखिल कुलकर्णी यांनी केले.

loading image
go to top