आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू; ऑनलाईन अर्ज भरता येणार 

ब्रिजमोहन पाटील
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

इथे भरा अर्ज
ऑनलाईन प्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट पर्यंत उपलब्ध असणार आहेत.

पुणे : शिक्षण झाल्या झाल्या नोकरी हवी आहे तर मग कौशल्य असणे गरजेचे आहे. यासाठी उत्तम पर्याय म्हणजे 'आयटीआय'. इयत्ता १०वीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातील 'आयटीआय' संस्थामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टला सकाळी ११ पासून सुरू झाली आहे. यंदा राज्यातील शासकीय व खासगी अशा ९८६ संस्थामध्ये १ लाख  ४५ हजार जागा उपलब्ध आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आय.टी.आय.) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट २०२० सत्रातील प्रवेशासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. प्रवेशोच्छुक उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती, प्रवेश पध्दती व नियमांचा अभ्यास करुनच ऑन लाईन प्रवेश अर्ज सादर करावा, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. 

पालक व विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी खास यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. अर्ज भरण्यापूर्वी https://youtu.be/v0vdvvamlyY या लिंकवर जाऊन व्हिडिओ पहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Big Breaking : सौरभ राव यांनी पुणे विभागीय आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला​

इथे भरा अर्ज
ऑनलाईन प्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट पर्यंत उपलब्ध असणार आहेत.

प्रवेशासाठी चार फेऱ्या
अर्ज भरल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी १८ ऑगस्ट रोजी जाहीर होईल. त्यानंतर 
२० ऑगस्ट रोजी पहिली प्रवेश फेरी  २१ ऑगस्ट रोजी दुसरी, ३ सप्टेंबर रोजी तिसरी तर ८ सप्टेंबरला शेवटची फेरी जाहीर होणार आहे. याकाळात विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश निश्चित करायचे आहेत. 

 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : आता तुमची दहावीची शाळा भरणार तुमचा अकरावीचा अॅडमिशन फॉर्म!​

आयटीआयची संख्या एकुण ९८६
सरकारी   ४१८ 
खासगी     ५६९

क्षमता    
सरकारी संस्था ९२, ४७२
खासगी संस्था   ५३१६०

 एकुण १, ४५,६३२

ट्रेड संख्या
सरकारी संस्था ७९
खासगी संस्था  ५२


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ITI admission process starts from today