Big Breaking : एमबीएच्या निकालाची घोेषणा; केव्हा लागणार पाहा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

राज्य सामाजिक परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या एमबीए आणि एमएमएसचा प्रवेश परीक्षेचा निकाल शनिवारी सकाळी ११ वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. 

पुणे : राज्य सामाजिक परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या एमबीए आणि एमएमएसचा प्रवेश परीक्षेचा निकाल शनिवारी सकाळी ११ वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पदवी प्राप्त केल्यानंतर मास्टर इन बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशन (एमबीए)आणि मास्टर इन मॅनेजमेन्ट स्टडीज (एमएमएस) या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राज्य पातळीवर प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा १४ आणि १५ मार्च रोजी झाली होती. या परीक्षेसाठी राज्य भरातून १ लाख १० हजार ६३१ विद्यार्थी बसलेले होते. 

ही परीक्षा झाल्यानंतर कोरोना लाॅकडाऊन मुळे इतर सर्व सीईटी परीक्षांचे वेळापत्रक कोलमडून गेले होते. तसेच पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतीम वर्षाच्या परीक्षा ही रखडलेल्या आहेत. त्यामुळे एमबीए आणि एमएमएस परीक्षेच्या निकालाचे काय होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. 

याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात ट्विटरद्वारे  एमबीए आणि एमएमएस सीईटीचा निकाल २२ मे रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होईल असे जाहीर केले  आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announcement of MBA results