पुणे- पिंपरीकरांनी वाढवलंय शिरूरकरांचे टेन्शन 

corona1
corona1
Updated on

शिरूर (पुणे) : शिरूर शहरासह तालुक्याच्या नऊ गावात मिळून आज दिवसभरात ११ जणांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून, शहरातील एका दहा वर्षे वयाच्या मुलालाही बाधा झाल्याचे या तपासणीतून स्पष्ट झाले. तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या तूलनेत शहरात सध्या कोरोनाबाधितांचा वेग वाढला असल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीतून स्पष्ट झाले. 

शिरूर शहरातील यशवंत कॉलनी परिसरातील एका व्यावसायिकाला आठ दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या घरातील इतर सदस्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी नेले होते. त्यातून त्यांच्या घरातील दहा वर्षीय मुलगा व ५२ वर्षीय पुरूषाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्याचबरोबर काची आळी परिसरातील एका २९ वर्षीय कामगारालाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार पाटील यांनी सांगितले. शहरात आतापर्यंत ८१ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यातील २५ जणांना उपचार करून घरी सोडले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुक्याच्या ग्रामीण भागापैकी कारेगाव, सोनेसांगवी, वरूडे, रांजणगाव गणपती, शिक्रापूर, कासारी व विठ्ठलवाडी येथील प्रत्येकी एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून, शिरूर शहरालगत असलेल्या शिरूर ग्रामीण येथील एकाचा व बाबूराव नगर येथील एका ३२ वर्षीय कामगाराचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली.  


दरम्यान, दैनंदिन कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यात कामगारांचा भरणा अधिक असल्याची माहिती पुढे आली असून, रांजणगाव एमआयडीसी व तालुक्यातील औद्योगिकरणात कामाला जाणाऱ्या कामगारांमार्फत संसर्ग फैलावत असल्याची बाब पुढे आली आहे. अनेक कंपन्यांत पुणे, पिंपरी- चिंचवड येथील 'हॉटस्पॉट'मधून कामगार कामाला येत असून, त्यांच्यामार्फत इतर कामगारांत संसर्ग फैलावत असल्याचे दिसत आहे. कंपन्यांनी पुरेशी खबरदारी घेण्याचा किंवा हॉटस्पॉटमधून येणाऱ्या कामगारांना काही दिवस कंपनीत प्रवेश न देण्याचा मुद्दा पुढे आला आहे. 

शहरातील दहा दिवसांची टाळेबंदी उठल्यानंतर अनेक ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र असून, नगर परिषद प्रशासनाने काल एका बॅंकेवर, तर आज येथील एका परवानाधारक दारूच्या दुकानावर कारवाई केली. प्रत्येकी एक हजार रूपयांचा दंड आणि दिवसभरासाठी टाळे ठोकल्याची कारवाई होऊनही इतर दुकानदारांत व व्यावसायिकांत फारशी शिस्त आल्याचे दिसत नाही. सरळ सांगुन शिस्त लागत नसेल, तर उद्यापासून वेगळी आणि कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com