पुरंदर पु्न्हा हादरले, आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू

corona1
corona1
Updated on

पुणे : पुरंदर तालुक्यात कोरोनाचे आणखी 13 रुग्ण सापडले असून, त्यात चार जण सासवड शहरातील आहेत. तसेच, सासवड येथील एका व्यापाऱ्याचा आणि पिसर्वे येथील एका तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

सासवड : सासवड शहरात आज कोरोनाचे आणखी चार रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 234 झाली आहे. तसेच, पुरंदर तालुक्यात सासवडच्या चार रुग्णांसह एकूण 13 जण कोरोना पाॅझिटिव्ह निष्पन्न झाले. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 440 झाली आहे. तसेच, सासवड शहरातील एका 67 वर्षीय व्यापाऱ्याचा आज येथे रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. तर, पिसर्वे गावात एक 35 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. त्यातूनच तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या मृतांची संख्या 19 झाली आहे. त्यात एकट्या सासवड शहरातील मृतांची संख्या आठ आहे. 

पुरंदर तालुक्यातील व विशेषत: सासवड शहरातील शेकडो लोक पुणे व बाहेर गावाहून जा- ये करतात. त्यातून कोरोना संसर्ग रोखणे दमछाक करणारे आहे. त्यातून नित्यदिनी रुग्ण आढळून येत आहेत. तालुक्यात ग्रामीण भागातील संसर्ग होणारी गावे आज तब्बल 46 पर्यंत पोचली आहेत. सासवडला तुलनेने कमी म्हणजे 4 रुग्णांसह माहूर येथे चार व परिंचे, भिवरी, टोणपेवाडी, नारायणपूर या गावात प्रत्येकी एक, असे रुग्ण आढळून आले. 

माळशिरस : पिसर्वे येथे सर्वात प्रथम कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या तरुणाचा आज पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आठवड्यापूर्वी येथील महादेव मळ्यातील एक तरुण प्रथम कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याला उपचारासाठी पुणे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गावात परत नव्याने चार रुग्ण सापडले. गावातील सर्व व्यवहार मागील काही दिवसांपासून बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, पुण्यामध्ये उपचार चालू असताना तरूणाचा मृत्यू झाला.   त्यामुळे पिसर्वे ग्रामस्थांसह तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वच गावातील नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com