esakal | बारामतीकरांचे धाबे दणाणले, कोरोना रुग्णांच्या संख्येत एवढी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

कोरोनाचा आज बारामती शहर व तालुक्यात उद्रेक झाला. कोरोना सुरू झाल्यापासूनचा उच्चांकी रुग्णांचा आकडा आज पार झाला. आज एकाच दिवसात बारामती शहर व तालुक्यातील 

बारामतीकरांचे धाबे दणाणले, कोरोना रुग्णांच्या संख्येत एवढी वाढ

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : कोरोनाचा आज बारामती शहर व तालुक्यात उद्रेक झाला. कोरोना सुरू झाल्यापासूनचा उच्चांकी रुग्णांचा आकडा आज पार झाला. आज एकाच दिवसात बारामती शहर व तालुक्यातील 17 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. आज बारामती तालुक्यातील आठ, तर शहर व परिसरातील नऊ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आकड्याने आज ख-या अर्थाने बारामतीकरांचे धाबे दणाणले आहे. आता बारामतीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 165 वर जाऊन पोहोचली आहे. 

फी कपातीसाठी मेल भेजो आंदोलन

बारामतीत रुग्णांची नियमित व वेगाने वाढणारी संख्या चिंताजनक विषय बनत असून, आता प्रशासनापुढे चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. आज बारामती तालुक्यातील सुपे राजबाग येथील तीन, होळ येथील एक, गुनवडी येथील दोन, पारवडी व कांबळेश्वरमधील प्रत्येकी, एक असे आठ जण कोरोनाग्रस्त आहेत. दरम्यान बारामती शहरातील रुई, फलटण रस्त्यावरील जाधव वस्तीवरील दोन, दाते पेट्रोल पंप, पाटस रस्ता तसेच गुनवडीतील एक, असे एकूण नऊ जण कोरोनाग्रस्त असल्याचे तपासणीनंतर निष्पन्न झाले आहे. 

कोरोना मृतांवरील अंत्यसंस्काराचे बील कोण देणार

काल बारामती शहरातील लक्षणे असलेल्या व कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या संपर्कातील 96 जणांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 79 नमुने निगेटिव्ह आले आहेत. मात्र, आता एकाच दिवशी 17 रुग्ण कोरोनाग्रस्त आढळल्याने आता बारामतीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 165 वर जाऊन पोहोचली आहे. बारामतीतील रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता आता पुन्हा एकदा काही कडक निर्बंध घालायचे का याची चर्चा सुरु झाली आहे. नियमितपणे वाढणारे रुग्ण आणि मृत्यूचेही नियमित प्रमाण ही बाब चिंताजनक आहे. जितके रुग्ण अधिक संख्येने मिळत आहेत, तितक्याच प्रमाणात कोरोनाग्रस्तांची संख्याही वाढू लागली आहे.