पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आणखी एक खटला दाखल; ५ मार्चच्या निकालाकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 March 2021

या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे अद्याप या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही. ​

पुणे : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणाची वानवडी पोलिसांनी चौकशी करावी. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. याबाबतचे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत, अशी मागणी करणारा आणखी एक खटला लष्कर न्यायालयात दाखल झाला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीने याबाबत न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. त्यावर झालेल्या युक्तिवादानंतर हा खटला दाखल झाला आहे. या प्रकरणात दाखल झालेला हा दुसरा खटला आहे. यापूर्वी लीगल जस्टिस सोसायटीतर्फे ॲड. भक्ती पांढरे यांनी देखील फिर्याद दिली होती. त्यानुसार खटला दाखल आहे. या दोन्ही अर्जांवर पाच मार्च रोजी निकाल होणार आहे. या खटल्यात देखील कोणतीही व्यक्ती किंवा संशयिताचे नाव देण्यात आलेले नाही.

रोहित पवारांचा मोदी सरकारला सल्ला; 'पेट्रोल-डिझेल दरवाढ आटोक्यात आणायचीय तर...'​

या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे अद्याप या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही. या प्रकरणात कोणाचा हात नाही, असे पोलिसही स्पष्ट करीत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास व्हावा. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना करावेत, यासाठी आम्ही हा खटला दाखल केला आहे, अशी माहिती भाजपा वकील आघाडीच्या अध्यक्ष ॲड. ईशाना जोशी यांनी दिली.

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी : गुरुवारी पूर्ण दिवस पाणीपुरवठा राहणार बंद​

पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही. पोलिसांनी अद्याप स्वतःहून तक्रार दाखल केली नाहीत. ते कोणाची वाट वाहत आहे हे समजत नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो आहोत. आमच्या अर्जावर आज युक्तिवाद झाला आहे. याबबाची पुढील सुनावणी पाच मार्च रोजी होणार आहे.
- ॲड. ईशाना जोशी, अध्यक्षा, भाजपा वकील आघाडी

या आहेत मागण्या :
- वानवडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा.
- तपासातील निष्कर्षांवर गुन्हा दाखल करावा.
- खटला गुणदोषावर चालवून आरोपींना कडक शासन करावे.
- न्यायाच्या दृष्टीने न्यायालयाने आदेश द्यावेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another case filed in Lashkar Court in suicide case of Tik tok star Pooja Chavan