दौंड व वेल्हे तालुक्यात वाढलाय कोरोनाचा धोका....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

वेल्हे तालुक्यातील एका पंचवीस वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली असून, दौंड शहरात दोन महिलांसह एकूण सहा जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. 

पुणे : वेल्हे तालुक्यातील एका पंचवीस वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली असून, दौंड शहरात दोन महिलांसह एकूण सहा जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. 

पुणे : लग्न समारंभांना होतीये गर्दी; शासनाच्या निर्णयाला केराची टोपली...

वेल्हे : वेल्हे तालुक्यातील अंबवणे येथील एका पंचवीस वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली असल्याची माहीती तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली. त्यामुळे तालुक्यातील एकुण कोरोना बाधीतांची संख्या ३६ वर पोहचली आहे.

अंबवणे येथील युवक कामासाठी भोर तालुक्यातील वरवे येथील एका खासगी कंपनीत जात होता. या कंपनीमधील एकाला २५ जुन रोजी कोरोनाची बाधा झाली होती. या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील १८ व्यक्तीना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामधये वेल्हे तालुक्यातील अंबवणे येथील एक युवक तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज या युवकाचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. या युवकच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेणे सुरु असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॅा. अंबादास देवकर यांनी सांगितले. अंबवणे परिसर सील केला आहे.

पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे

वेल्हे तालुक्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३६ वर पोहचली आहे. यामध्ये ३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, उर्वरित रुग्णांवर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तालुक्यातील वडगाव झांजे येथील रहिवाशी असलेल्या एका कोरोनाबाधितांचा मुत्यु झाला असून, त्यांची नोंद पुणे शहरात घेतली आहे.

दौंड  : दौंड शहरात दोन महिलांसह एकूण सहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

दौंड उप जिल्हा रूग्णालयाच्या वतीने ४६ जणांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल ३० जून रोजी आला असून, ४६ पैकी ०६ जणांना विषाणूची बाधा झाली आहे. शहरातील पंडित नेहरू चौकातील एक महिला व एक पुरुष, पानसरे वस्ती येथील दोन पुरुष, तुकाईनगर येथील एक महिला व जनता कॅालनी येथील गुलमोहर अपार्टमेंट परिसरातील एक पुरूष, अशा सहा जणांचा बाधितांमध्ये समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another corona patient was found in Daund and Velhe talukas