पुण्याहून बारामतीला आला, शंका आल्यामुळे केली कोरोना चाचणी... 

मिलिंद संगई 
Tuesday, 12 May 2020

बारामती तालुक्‍यातील माळेगाव बुद्रूक येथील एकास कोरोनाची लागण झाल्याचे आज रिपोर्टवरून स्पष्ट झाले आहे.

बारामती (पुणे) : बारामती तालुक्‍यातील माळेगाव बुद्रूक येथील एकास कोरोनाची लागण झाल्याचे आज रिपोर्टवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे माळेगाव बुद्रूक गावची महसुली सीमा फक्त बंद करण्यात आली आहे. बारामती शहर व एमआयडीसीच्या कामकाजावर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

वा रे पठ्ठ्या, उजनीत धरणात बुडत होते सहा जण...

कोरोनाची लागण झालेला रुग्ण पुणे येथे वायरमन म्हणून काम करत आहे. त्याच्या एका मित्राला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्याने आपणहूनच प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधला. त्याची तपासणी केल्यानंतर आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी माळेगाव बुद्रूक या गावाची सीमा ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली असून, अत्यावश्‍यक सेवा वगळून इतर सेवा व व्यवहारांसह वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. बारामती शहराच्या बाजारपेठेवर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित कोरोना रुग्ण हा 7 मे रोजी पुण्याहून बारामतीला आला होता. त्याला कोणताही त्रास होत नाही. मात्र, त्याचा जवळचा मित्र असलेल्या एका वायरमनला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याने बारामतीत प्रशासनाशी संपर्क साधला.

पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी एसटी सेवा

चे घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा आज अहवाल आला. त्यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, संबंधित रुग्ण पुण्यात असताना कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्यानेच त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट असल्याने त्याला माळेगाव येथे कोरोनाची लागण झाली नसल्याचेही निष्पन्न झाले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another coronavirus infection in Baramati taluka