पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी एसटीची सेवा बंद;आता खासगी बसचाच आधार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मे 2020

- नाशिक, सोलापूर, नगरच्या बस रद्द
-प्रहारच्या माध्यमातून नांदेड, लातूरसाठी पाच बस 

पुणे : राज्य सरकारने मोफत बस सेवा सुरू केलीच नाही, पण सशुल्क सुरू असलेली सेवाही बंद केल्याने आज मनविसेतर्फे नाशिक, नगर, सोलापूरला जाणाऱ्या बस रद्द झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुणे सोडता आले नाही. तर, प्रहार संघटनेच्या माध्यमातून आज (ता.) नांदेडसाठी तीन तर लातूरच्या विद्यार्थ्यांसाठी दोन खासगी बसमधून ११० विद्यार्थी घरी जाऊ शकले. भाजपतर्फे सांगली व कोल्हापूर साठी दोन बस सोडल्या. 

lay.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal&hl=en" target="_blank">ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राज्य सरकारने 'कोटा'तील विद्यार्थी जसे मोफत महाराष्ट्रात आणले तसेच पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकार व्यवस्था करेल अशी अपेक्षा होती. राज्य सरकारने तसे संकेतही दिले होते. दोन दिवसांपूर्वी मोफत बसचा आदेशही काढला होता. मात्र एका रात्रीतून हा आदेश मागे घेऊन केवळ परप्रांतांत जाणाऱ्या नागरिकांना मोफत बस पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी प्रति किलोमिटर ४४ रुपये अशा दराने पैसे भरून विद्यार्थ्यांना घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली. यात आतापर्यंत दोन नगर, दोन जळगाव आणि एक बस नाशिकला गेली आहे. पुढील दोन दिवसात आणखी काही एसटी बस सोलापूर, कोल्हापूर तसेच लातूर, नांदेड, यवतमाळ या भागातील विद्यार्थ्यांना घेऊन जाणार होत्या. मात्र, मंगळवारपासून राज्यातील सशुल्क बस सेवाही बंद केल्याने विद्यार्थी संघटनांचे नियोजन बिघडले आहे. यामुळे विद्यार्थी पुण्यात अडकून पडलेल्या हाल सुरू आहेत. 

आणखी वाचा- पुण्यात सिंहगड रस्यानं दाखवला संयम; रोखला कोरोनाचा राक्षस

मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव म्हणाले, " मनविसेने आत्तापर्यंत १ लाख रुपये भरून दोन बस जळगाव व प्रत्येकी एक बस नाशिक व नगर साठी सोडली होती. आज नाशिक, सोलापूर व नगर येथे प्रत्येकी एक बस जाणार होती. विद्यार्थ्यांची यादी तयार करून पोलिसांकडून परवानगी घेतली होती. मात्र, एस. टी. महामंडळाने बस उपल्ब्ध करून देण्यास नकार दिला आहे. सरकारचे धोरण सतत बदलत असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. सरकारने चुकीचे निर्णय घेणे थांबवावेत. 

आणखी वाचा-पुण्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय; गेल्या तीन दिवसांत...

प्रहार संघटनेचे सचिन ढवळे म्हणाले, "मराठवाड्यातील प्रवास लांब पल्ल्याचा असल्याने त्यांच्यासाठी सोय होत नव्हती. त्यामुळे नांदेड व लातूरसाठी एसटी बसची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे लातूर व नांदेड येथील विद्यार्थ्यांना खासगी बसमधून सोडले जाणार आहे.  त्यामुळे आज संध्याकाळी नांदेडला तीन तर लातूरसाठी खासगी बसमधून विद्यार्थ्यांसाठी सोय केली आहे. यातून ११० विद्यार्थ्यांना घरी सोडले जाणार आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

मराठवाडा, विदर्भासाठी नियोजन सुरू
भाजपच्या "घर चलो अभियान" अंतर्गत आज पुण्यातून सातारा, कराड ,सांगली आणि कोल्हापूर अशा ठिकाणांसाठी विद्यार्थी व इतर नागरिकांना घेऊन बस रवाना झाल्या. माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी प्रवाशांसाठी मास्क, पाण्याची बाटली, सॅनीटायझर व जेवणाचा डबा यांची व्यवस्था केली. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सोय होत असली तरी मराठवाडा, विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी कोणीच पुढे येत नसल्याचा मुद्दा 'सकाळ'ने उपस्थित केला होता. त्यास प्रतिसाद देत भाजपने मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सुरू करण्याचे नियोजन आहे. या बस लवकरच सुटतील, असे डॉ. श्रीपाद ढेकणे यांनी सांगितले.

मोठी बातमी : रांगेत न थांबता दारू मिळणार; पुण्यात ई-टोकनला सुरवात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST service closed for students stranded in Pune