आंबवणे येथील अपघातातील आणखी एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

मृतांची संख्या दोन
Gokul Bandal, Narayan Ingavale
Gokul Bandal, Narayan IngavaleSakal

वेल्हे, (पुणे) - नसरापूर वेल्हे रोड वर आंबवणे गावाजवळ झालेल्या अपघातामध्ये मंगळवारी (ता. ३१) रोजी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. आता या अपघातामध्ये जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा मृत्यू आज पहाटे झाल्याची माहिती वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली आहे. नारायण मारुती इंगवले (वय ६०) असे आज मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

याबाबत नवनाथ बांदल यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार चारचाकी वाहन टाटा हेक्सा एमएच- ११ सीजी ७३०५ च्या चालकावर गुन्हा दाखल झाला असुन गाडीसह चालक फरार असुन पोलीस शोध घेत आहेत. तर गोकुळ गुलाब बांदल (वय २९) या युवकाचा काल अपघातात मृत्यू झाला होता. दोघे जखमी होते त्यापैकी नारायण मारुती इंगवले याचा आज पहाटे मृत्यू झाला असुन काळू आण्याबा बांदल याच्या नसरापुर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. तीघेही निगडे बुद्रुक (ता. वेल्हे) येथील रहिवासी असुन चारचाकी नसरापूरकडून वेल्हेकडे निघाली होती तर दुचाकी ही करंजावणेकडुन कडून अंबवणेकडे जात असताना समोरासमोर धडक झाली होऊन अपघात झाला आहे. जखमींवर नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वेल्हे पोलीसांकडुन अधिक तपास सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com