esakal | पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी आणखी १४ कोटींचा निधी
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी आणखी १४ कोटींचा निधी

पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी आणखी १४ कोटींचा निधी

sakal_logo
By
- गजेंद्र बडे

पुणे : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सोमवारी (ता.५) पुणे जिल्ह्याला आणखी १४ कोटी ४ लाख ३९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याआधी १ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. यामुळे जिल्ह्याला आता १५ कोटी ६७ लाख ३९ हजार रुपयांचा निधी कोरोना नियंत्रणासाठी उपलब्ध झाला आहे.

या निधीचा वापर हा कोरोनाबाधितांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, त्यासाठी तात्पुरती निवासव्यवस्था करणे, अन्न, कपडे., वैद्यकीय देखभाल, संशयित कोरोना रुग्णांचे नमुने जमा करणे, तपासणी, छाननी आणि कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे. गरज भासल्यास अतिरिक्त कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारणे, अग्निशमन, पोलिस, स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य सेवेतील कर्मचारी आदींना स्वसंरक्षणासाठीची साधने खरेदी करणे (उदा. मास्क, सॅनिटायझर आदी), हवा शुद्धीकरण यंत्रे, थर्मल स्कॅनर व इतर साधने खरेदी करण्यासाठी हा निधी वापरता येणार आहे. याशिवाय लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांसाठी मदत छावण्या सुरु करणे, अन्य ठिकाणी आश्रय घेतलेल्या स्थलांतरित कामगारांसह बेघर व्यक्तींना अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी या निधीचा वापर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

हेही वाचा: 'पीके' चित्रपटाचे मूळ निगेटिव्ह एनएफएआयकडे सूपूर्द

तालुकानिहाय उपलब्ध निधी (रुपयांत)

- पुणे शहर --- पाच लाख

- हवेली --- १ कोटी ५९ लाख १५ हजार

- मावळ --- १ कोटी सात लाख १८ हजार

- मुळशी --- १ कोटी आठ लाख २६ हजार

- शिरूर --- १ कोटी २० लाख १५ हजार

- भोर --- ६३ लाख ५ हजार

- पुरंदर --- ९० लाख ५४ हजार

- दौंड --- ३९ लाख ७१ हजार

- खेड --- १ कोटी ६० लाख ८२ हजार

- आंबेगाव --- १ कोटी चार लाख ६१ हजार

- जुन्नर --- १ कोटी २२ लाख २२ हजार

- बारामती --- २ कोटी १० लाख ५४ हजार

- इंदापूर --- ९३ लाख २९ हजार

....................................................

- एकूण --- १४ कोटी ०४ लाख ३९ हजार.

loading image