esakal | 'पीके' चित्रपटाचे मूळ निगेटिव्ह एनएफएआयकडे सूपूर्द
sakal

बोलून बातमी शोधा

rajkumar hirani

'पीके' चित्रपटाचे मूळ निगेटिव्ह एनएफएआयकडे सूपूर्द

sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे, नॅशनल फिल्म आर्काईव्ह ऑफ इंडियातर्फे (एनएफएआय) आता ‘पीके’ (PK) या चित्रपटाचे जतन करण्यात येत आहे. चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी (rajkumar hirani) यांच्या २०१४ साली आलेल्या या चित्रपटाची मूळ निगेटिव्ह जतन करण्यात येत असल्याचे नुकतेच एनएफएआयतर्फे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. यासाठी हिरानी यांनी नुकतीच पीके चित्रपटाची मूळ निगेटिव्ह मुंबईतील एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांना सूपूर्द केली आहे.(Original negative of PK film handed over to NFAI by rajkumar hirani )

मगदूम म्हणाले, ‘‘एनएफएआयतर्फे हिरानी यांचे मुन्नाभाई एमबीबीएस (२००३), लगे रहो मुन्नाभाई (२००६) आणि थ्री इडियटस् (२००९) या चित्रपटांचे मूळ निगेटिव्हचे यापूर्वीच जतन करण्यात आले आहे. तसेच आता ‘पीके’चा ही यात समावेश झाला. हा चित्रपट ‘सेल्युलॉइड’वर शूट केला गेला होता. तर सेल्युलॉइडपासून डिजिटलमध्ये चित्रपट निर्मितीचा झालेला बदल हा २०१३ ते २०१४ दरम्यानच्या कालावधित झाला. त्या अनुषंगाने या चित्रपटाचे जतन करणे महत्त्वाचे आहे.’’

‘पीके’ चित्रपटाचे लेखन, संपादन व दिग्दर्शन हिरानी यांनी केले असून हे भारतात सेल्युलॉइडवर शूट होणाऱ्या शेवटच्या काही चित्रपटांपैकी एक आहे. तर, हिरानी यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचे छायाचित्र, पोस्टर, लॉबी कार्ड व इतर साहित्य एनएफएआयला देण्यात येणार आहे.

हेही वाचा: 'माझा होशील ना'मध्ये येणार 'आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज'चा खरा मालक

‘‘मूळ निगेटिव्ह टिकवणे महत्त्वाचे होते आणि ते पुण्यात एनएफएआयमध्ये जतन केले जाईल याचा मला आनंद आहे. चित्रपटांचे जतन करणे हे चित्रपट निर्मात्याचे कर्तव्य आहे आणि एनएफएआयच्या माध्यमातून हे होत आहे. यासाठी सर्व चित्रपट निर्मात्यांना एनएफएआयला सहकार्य करण्याची गरज आहे.’’

- राजकुमार हिरानी, चित्रपट निर्माते

हेही वाचा: 'गाण्याची वाट लावली'; 'चुरा के दिल मेरा'चं रिमेक ट्रोलर्सच्या निशाण्यावर

loading image