मुलांच्या शाळेची फी वाढवली? अधिकाऱ्यांना फोन करा; जाणून घ्या पुण्याचे नंबर

School-Students
School-Students

पुणे : "राज्यातील सर्व खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संस्थांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रवेश देताना विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे वाढीव शुल्क आकारू नये. पालकांनी शुल्कवाढी संदर्भात काही तक्रारी असल्यास त्यांनी आपल्या जिल्ह्याच्या संनियंत्रकाशी संपर्क साधावा," असे आवाहन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे केले आहे.

राज्यातील सर्व शिक्षण संस्थांनी येत्या शैक्षणिक वर्षात (2020-21) कोणत्याही शुल्कात (फी) वाढ करू नये, असे स्पष्ट आदेश   शालेय शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी दिले असतानाही पालकांकडून वाढीव शुल्काची मागणी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

या पार्श्वभूमीवर सरकारने आता आणखी एक पाऊल टाकले आहे. शालेय शिक्षण विभागाने आता पालकांना तक्रार नोंदविता यावी, यासाठी संबंधित भागातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. यात शिक्षण विभागाने जिल्हानिहाय अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. यात जवळपास ८७ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

पुण्यासाठी संनियंत्रण अधिकारी आणि त्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे :
विभाग : संनियंत्रण अधिकारी (पद) : संपर्क क्रमांक
पुणे विभाग : मीना शेंडकर (शिक्षण उपनिरीक्षक) : 9890643222
पुणे विभाग : धनाजी बुटे (शिक्षण उपनिरीक्षक) : 9922458799
पुणे : ज्योती परिहार (उपशिक्षणाधिकारी- प्राथमिक) : 8888225364
पुणे मनपा : धनजंय परदेशी (उपप्रशासकीय अधिकारी) : 9404609170

"शुल्कवाढीबाबत संनियंत्रण अधिकाऱ्यांची यादी जाहीर झाली असली, तरीही अधिकृत पत्र आमच्यापर्यंत आलेले नाही, ते पत्र येण्याची  प्रतीक्षा करत आहोत. पालकांच्या शुल्कवाढीच्या तक्रारीवर शासननिर्णयाप्रमाणे कार्यवाही केली जाईल. संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे संबंधित तक्रार पाठविण्यात येईल आणि त्याद्वारे कार्यवाही होईल."
- धनजंय परदेशी, उपप्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग, पुणे महानगरपालिका

"पालकांच्या सोयीसाठी संपर्क क्रमांक दिल्याने आता आमच्या तक्रारीची अधिकृत नोंद होऊ शकणार आहे. पण पालकांनी शुक्लवाढीबाबत तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकारी काय कार्यवाही करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे,"
- विकास वानखेडे, पालक

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com