दुचाकीच्या धडकेनंतर बसखाली चिरडल्याने आणखी एका तरुणाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश एका खासगी कंपनीमध्ये कामाला होता. रविवारी सकाळी तो बंडगार्डन पुलावरुन त्याच्या दुचाकीवरुन कामाला जात होता. त्याचवेळी शेजारुन जाणाऱ्या एका भरधाव दुचाकीने त्यास धडक दिली. त्यामुळे आकाश दुचाकीसह रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या पीएमपी बसच्या चाकाखाली आल्याने आकाश गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. 

पुणे : भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे रस्त्यावर पडलेल्या दुसऱ्या दुचाकीवरील तरुणाच्या अंगावरुन जवळून जाणाऱ्या पीएमपी बसचे चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यु झाला. ही घटना रविवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील बंडगार्डन पुलावर घडली. याच पद्धतीने रविवारी दुपारी टिळक रस्त्यावर झालेल्या अपघातातही एका तरुणास आपला जीव गमवावा लागला होता. 

एल्गारची सुनावणी कुठे होणार ? सहा फेब्रुवारीला निकाल
 
आकाश कृष्णा पिल्ले (वय 27, रा. क्वीन्स गार्डन) असे अपघातात मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा पिल्ले (वय45) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पीएमपीएल बसचालकाविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मैलापाण्यात काम करणारे घेणार मोकळा श्वास कारण...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश एका खासगी कंपनीमध्ये कामाला होता. रविवारी सकाळी तो बंडगार्डन पुलावरुन त्याच्या दुचाकीवरुन कामाला जात होता. त्याचवेळी शेजारुन जाणाऱ्या एका भरधाव दुचाकीने त्यास धडक दिली. त्यामुळे आकाश दुचाकीसह रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या पीएमपी बसच्या चाकाखाली आल्याने आकाश गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. 

इस्रोच्या वैज्ञानिकांसह उन्हाळ्याची सुट्टी घालविण्याची आहे? मग 'ही' बातमी वाचा
 
सकाळी साडे दहा वाजता येरवड्याला झालेल्या अपघातात तरुणाचा जीव गेला असतानाच, त्यानंतर अवघ्या दिड तासांनी टिळक रस्त्यावर रिक्षाची धडक बसून फरफटत जाणाऱ्या दुचाकीस्वार आकाश विधाते या तरुणालाही बसची धडक बसून त्याचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांमधील तरुणांनी हेल्मेट परिधान केले नव्हते. एकाच दिवसात दोन तरुणांचा बसखाली येऊन झालेल्या विचित्र अपघातामध्ये मृत्यू झाला. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another young man dies after Accident at bund garden yerawada pune